शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

चासकमान धरण १00 टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:36 IST

चासकमान धरण १०० टक्के भरल्याने खबरदारीचा उपाय व संभाव्य पावसाची शक्यता गृहीत धरून सकाळी सहा वाजता चासकमान धरणाचे पाचही दरवाजे ५० सेंटिमीटरनी उघडून सांडव्याद्वारे १,८५० क्युसेक्स वेगाने भीमा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

चासकमान : चासकमान धरण १०० टक्के भरल्याने खबरदारीचा उपाय व संभाव्य पावसाची शक्यता गृहीत धरून सकाळी सहा वाजता चासकमान धरणाचे पाचही दरवाजे ५० सेंटिमीटरनी उघडून सांडव्याद्वारे १,८५० क्युसेक्स वेगाने भीमा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. डाव्या कालव्याद्वारे ८५० असे एकूण २,७०० क्युसेक्स वेगाने पाणी नदीपात्रात सोडले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती शाखा अभियंता उत्तम राऊत यांनी दिली.तसेच चासकमान धरण पाणलोटक्षेत्रात सरासरी एकूण ४४५ मिलिमीटरइतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे.खेड तालुक्याच्या पश्चिम भागात विशेषत: सह्याद्रीच्या डोंगररांगांवर मागील महिन्यात संततधार पाऊस झाल्याने चासकमान धरणात पाण्याची आवक वाढल्यामुळे ८.७५ टीएमसी क्षमता असलेले चासकमान धरण २१ जुलैला ९६.९० टक्के भरल्याने ५२७५ क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात आला होता.मागील दोन आठवड्यात पावसाने चासकमान धरण पाणलोटक्षेत्रात दडी मारल्याने धरणाच्या पाणलोटक्षेत्रात येणारी आवक बहुतांशी प्रमाणात थांबल्याने चासकमान धरणात ९७.५९ टक्के भरून धरणाचे पाचही दरवाजे २७ जुलैला संध्याकाळी ४ वाजता बंद करण्यात आले होते. परंतु कळमोडी परिसरासह भीमनेर खोऱ्यात अधूनमधून पडणाºया पावसाने पश्चिम भागातील भीमा नदीबरोबरच एकलहरे, शिरगाव, धामणगाव, भोरगिरी, पाबे, आव्हाट, वाळद, खरोशी, मंदोशी, वाडा, वाळद आदींसह अनेक गावांतील ओढे-नाल्याबरोबरच भातखाचरातील पाणी खळाळून वाहत आहे. त्यामुळे चासकमान धरणात पाण्याचा विसर्ग कमी जास्त प्रमाणात होत आहे.चासकमान धरण ५ आॅगस्टला सकाळी शंभर टक्के भरले. मागील वर्षी धरण १४ आॅगस्टला भरले होते.परंतु शनिवारी सकाळपासून धरण पाणलोटक्षेत्रात पाऊस सक्रिय झाला असल्याने धरणाचे आज पुन्हा पाचही दरवाजे उघडण्यात आले.सध्या चासकमान धरणात १०० टक्के पाणीसाठा झाला असून पाणीपातळी ६४९.५३ मीटर एकूण साठा २४१.६९ दलघमी आहे, तर उपयुक्त साठा २१४.५० दलघमी आहे.

टॅग्स :DamधरणPuneपुणे