शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मराठी नाटकांच्या प्रेमापोटी अमेरिकेतील संस्थाचा पडद्यामागच्या कलाकारांसाठी मदतनिधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 19:15 IST

कोरोनामुळे गेल्या महिनाभरापासून रंगभूमीचा पडदा उघडलेला नाही...

ठळक मुद्देजागतिक स्तरावर मराठी रंगभूमीला मोठे स्थान : 1 मे ला होणार वितरणअमेरिकेतील नाट्यसंस्था, नाट्य कलाकार आणि रसिकांनी मिळून 14 लाख रुपयांचा मदतनिधी

पुणे: मराठी माणसांचे नाट्यप्रेम हे सर्वश्रुत आहेच. तो कुठेही गेला तरी नाटकांचे वेड राहतेच. म्हणूनच जागतिक स्तरावर मराठी रंगभूमीने मोठे स्थान मिळविले आहे. आज नाटकाचे प्रयोग विविध देशांमध्ये होत आहेत. याच ऋणानुबंधातून अमेरिकेत वास्तव्य असलेल्या भारतीयांनी  पडद्यामागील कलाकारांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.  कॅलिफोर्नियातील रंगमंच संस्था आणि बृहन महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका यांच्यासह उत्तर अमेरिकेतील अनेक नाट्यसंस्था, नाट्य कलाकार आणि रसिकांनी मिळून सुमारे 14 लाख रुपयांचा मदतनिधी उभारला आहे. हा मदतनिधी महाराष्ट्र दिनी (1 मे )  कलाकारांना दिला जाणार असल्याची माहिती बृहन महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिकेचे भारतीय समन्वयक राजीव केतकर यांनी दिली.      कोरोनामुळे गेल्या महिनाभरापासून रंगभूमीचा पडदा उघडलेला नाही. महाराष्ट्रातील सगळे नाट्यप्रयोग पूर्णपणे बंद पडले आहेत . अशा अवस्थेत या हातावर पोट असणार्‍या या पडदयामागच्या कलाकारांची अवस्था फारच बिकट झाली आहे.  त्यांना मदत करण्यासाठी भारतातूनच नव्हे तर जगभरातून अनेक हात पुढे येत आहेत. यासाठीच सर्व संस्थांनी एकत्र येऊन मदतनिधी उभारला आहे. बृहन महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिकेच्या अध्यक्ष विद्या जोशी, रंगमंच संस्थेचे संस्थापक माधव आणि स्मिता कर्‍हाडे यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत संपूर्ण अमेरिकेतील नाट्यसंस्था या उपक्रमात सहभागी झाल्या. अभिनेते विजय  केंकरे, अजित  भुरे, प्रशांत दामले, अमेय वाघ, संकर्षण कर्‍हाडे, जादूगार जितेंद्र  रघुवीर, अमेरिकेतील मीना नेरुरकर  आणि अनेक स्थानिक  कलाकारांनी देखील मदतीसाठी आवाहन केले. त्यानंतर 15 दिवसांत 14 लाख रुपये जमा झाले आहेत.    महाराष्ट्र फाउंडेशन आणि वेगवेगळ्या संस्थांना हा मदतीनिधी कलाकारांपर्यंत पोचविण्यात येणार आहे. या कामासाठी महाराष्ट्र फाउंडेशनचे वैभव साठे,   राजीव भालेराव यांनी सहकार्य केले आहे.महाराष्ट्र दिनी आत्तापर्यंत संकलित  झालेल्या निधीचे वितरण करण्यात येणार असल्याचे केतकर यांनी सांगितले. याशिवाय बृहन महाराष्ट्र मंडळाने ' कोव्हिड 19' हेल्पलाईन देखील सुरू केली असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसTheatreनाटक