बाप-लेकावर आरोपपत्र दाखल

By Admin | Updated: October 31, 2014 02:05 IST2014-10-31T02:05:21+5:302014-10-31T02:05:21+5:30

शिरूर येथील शासकीय बालगृहातील दोन अल्पवयीन मुलींवर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी बाप-मुलावर शिरूर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे.

The chargesheet on father-lane | बाप-लेकावर आरोपपत्र दाखल

बाप-लेकावर आरोपपत्र दाखल

पुणो : शिरूर येथील शासकीय बालगृहातील दोन अल्पवयीन मुलींवर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी बाप-मुलावर शिरूर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. याची सुनावणी विशेष अतिरिक्त सत्र न्यायाधीश साधना ¨शदे यांच्या न्यायालयात होणार आहे. यावेळी 56 साक्षीदारांची साक्ष नोंदवली जाईल.      
शब्बीर ए. बाले (52) व बबलू शब्बीर बाले (2क्) या दोघांनी अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. शब्बीर हा तेथील कनिष्ठ लिपिक असून, बबलू हा त्याचा मुलगा आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मीनाक्षी बिराजदार यांनी याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.   या दोन मुलींना पुनर्वसनासाठी केडगाव येथील पंडिता रमाबाई मुक्ती मिशन या संस्थेत पाठविले असताना, तेथील समुपदेशनादरम्यान हा प्रकार या मुलींनी सांगितला होता. (प्रतिनिधी)

 

Web Title: The chargesheet on father-lane