त्या चालकांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:10 IST2021-04-06T04:10:42+5:302021-04-06T04:10:42+5:30
निवेदनात असे म्हटले आहे की, १ एप्रिल रोजी सकाळी साडे सहा वाजता नीरा येथील नगर बायपस रोडवर एका बिगर ...

त्या चालकांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा
निवेदनात असे म्हटले आहे की, १ एप्रिल रोजी सकाळी साडे सहा वाजता नीरा येथील नगर बायपस रोडवर एका बिगर नंबर प्लेटच्या स्विफ्ट कारने दोन महिलांना जोरदार धडक दिली होती. यामध्ये या दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. अपघात नंतर कारचालकाने गाडीसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार बंद पडल्याने त्याचा हा प्रयत्न फसला आणि तो कार तिथेच सोडून पळून गेला. जखमीपैकी वैशाली काशीद या महिलेचा रविवारी मृत्यू झाला आहे. तर सुनीता मोराळे या मृत्यूशी झुंज देत आहेत. चार दिवसांनंतरही पोलिसांना अजून गाडीच्या मालकाचे नाव ही शोधता आले नाही. गाडीला नंबर प्लेट नसणे हे एक कारण पोलीस सांगत आहेत. मात्र अपघात करणाऱ्याने गाडीची ओळख पटू नये म्हणून काळजी घेतली हे यातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे दोषीवर कारवाई करण्याबरोबच संबंधित कार चालकावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.