एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शरजिल उस्मानी यांच्यावर गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:18 IST2021-02-05T05:18:26+5:302021-02-05T05:18:26+5:30

पुणे : अलिगड मुस्लिम विद्यापीठातील शरजिल उस्मानी यांनी एल्गार परिषदेत ‘हिंदुस्तान में हिंदू समाज बुरी तरीके से ...

Charge Sharjeel Usmani for making a provocative speech at the Elgar conference | एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शरजिल उस्मानी यांच्यावर गुन्हा दाखल करा

एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शरजिल उस्मानी यांच्यावर गुन्हा दाखल करा

पुणे : अलिगड मुस्लिम विद्यापीठातील शरजिल उस्मानी यांनी एल्गार परिषदेत ‘हिंदुस्तान में हिंदू समाज बुरी तरीके से सड़ चुका है’ आणि भारतीय न्यायव्यवस्था, कायदेमंडळ व प्रशासकीय व्यवस्था यांचा अपमान करत ’मी भारतीय संघराज्य मानत नाही’ अशी प्रक्षोभक विधान करून समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.. त्यांची ही विधाने भारतीय दंडसंहितेच्या १५३अ व २९५अ तसेच १२४अ या कलमांनुसार गुन्हा ठरतात. त्यामुळे उस्मानी यांच्यावर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, असा तक्रार अर्ज भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अँड. प्रदीप गावडे यांनी स्वारगेट पोलीस स्टेशनला दिला आहे..

शनिवारी (दि.30) गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पोलीस परवानगीनुसार एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात आयोजकांनी अलिगड मुस्लिम विद्यापीठातील शरजिल उस्मानी यांना भाषण देण्यासाठी आमंत्रित केले होते. यामध्ये आपल्या भाषणात त्यांनी भारतीय संघराज्य व हिंदूंविरोधात अत्यंत आपत्तीजनक व भडकावणारी विधाने केली आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशा स्वरूपाचा अर्ज आम्ही स्वारगेट पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना दिला आहे. त्यांनी चौकशी करून एफआयआर दाखल करून घेण्याची कारवाई केली जाईल असे सांगितले आहे. मात्र आम्ही याचा पाठपुरावा करीत राहणार असल्याचे अँड. प्रदीप गावडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

-------------------------------------

Web Title: Charge Sharjeel Usmani for making a provocative speech at the Elgar conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.