मे अखेर जिल्हा परिषदेत बदल्यांची धामधूम

By Admin | Updated: May 9, 2014 09:16 IST2014-05-08T20:15:17+5:302014-05-09T09:16:10+5:30

पुणे जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांच्या मे अखेर जिल्हा व तालुकास्तरावर बदल्या होणार असून १० टक्के बदल्या प्रशासकीय तर १० टक्केबदल्या विनंती बदल्या असणार आहेत.

Changes in the zilla parishad after the end of May | मे अखेर जिल्हा परिषदेत बदल्यांची धामधूम

मे अखेर जिल्हा परिषदेत बदल्यांची धामधूम

१० टक्के बदल्या प्रशासकीय : हजार प्राथमिक शिक्षकही
पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांच्या मे अखेर जिल्हा व तालुकास्तरावर बदल्या होणार असून १० टक्के बदल्या प्रशासकीय तर १० टक्केबदल्या विनंती बदल्या असणार आहेत.१ हजार प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या यामध्ये होण्याची शक्यता असून शिपाई म्हणून काम करणार्‍या परिचरांच्याही बदल्या यंदा केल्या जाणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या सेवेत सुमारे १८ हजार कर्मचारी आहेत.साडेबारा हजार शिक्षकांचा त्यात समावेश आहे. २०ते२३मे दरम्यान जिल्हास्तरावरील आणि २६ते३१ मे दरम्यान तालुकास्तरावरील बदल्या करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले असून बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने, संबंधित कर्मचार्‍यांच्या पसंतीनुसार केल्या जातील, असे अधिकार्‍यांनी आज सांगितले.
वाहनचालकांना या बदल्यांमधून वगळण्यात आले आहे.५३वय असलेल्या कर्मचार्‍यांना यामधून वगळले जाणार आहे.तसेच अपंग कर्मचारी किंवा ज्यांची मुले मतिमंद असतील त्यांच्या तसेच विधवा, परित्यक्ता यांनाही बदल्यांमधून वगळले जाणार आहे.
प्राथमिक शिक्षक,ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक,आरोग्य कर्मचारी यांचा बदली होणार्‍यांमध्ये समावेश आहे.पती पत्नी शासनाच्या सेवेत असतील तर त्यांची बदली ३० किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर असू नये, अशा शासनाच्या सुचना आहेत.

Web Title: Changes in the zilla parishad after the end of May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.