शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल वसुली ठेकेदारात बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 01:06 IST

कंपनीने उर्से आणि सोमाटणे येथील टोल प्लाझावर ३० ते ४० स्थानिक तरुणांना रोजगार दिल्याचे म्हटले आहे.

पुणे : पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील टोलवसुलीची आयआयबीची (इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रा. लि) मुदत संपुष्टात आल्याने टोल वसुलीचे काम सहकार ग्लोबल लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे.एमएसआरडीसीने (महाराष्टÑ स्टेट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) यासाठी नुकतेच टेंडर काढले होते. यामध्ये आयआरबीसह सहकार ग्लोबल आणि अन्य तीन कंपन्यांनी टेंडर भरले होते. सर्वाधिक किंमतीची निविदा असल्याने सहकार ग्लोबलला हे काम मिळाले आहे. त्याप्रमाणे कंपनीने टोलवसुलीला सुरूवातही केली आहे. तीन महिन्यांसाठी हा करार आहे.आॅगस्ट २००४ मध्ये एमएसआरडीसी आणि आयआरबीमध्ये करार झाला होता. त्यानुसार पुणे- मुंबई द्रुतगती महामार्ग आणि पुणे- मुंबई राष्टÑीय महामार्ग क्रमांक ४ (जुना पुणे- मुंबई रस्ता) यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम देण्यात आल होते. १५ वर्षांची ही मुदत नुकतीच संपली आहे. त्यामुळे तीन महिन्यांसाठी नव्याने टेंडर काढण्यात आले होते. या रस्त्यावर वार्षिक सुमारे एक हजार कोटी रुपयांचा टोल गोळा होतो. या रस्त्यासाठी सुमारे ८हजार कोटी रुपयांचा खर्च आला आहे. महाराष्टÑ शासनाने या टोलची मुदत ३० एप्रिल २०४५ पर्यंत वाढविली आहे. द्रुतगती महामार्ग आणि जुना महामार्ग यावरील ८ टोलप्लाझावरून ही टोलवसुली होते.दरम्यान, या टोलवसुलीचा ठेका घेतलेल्या कंपनीने स्थानिकांना डावलून बाहेरील व्यक्तींना उपठेका दिल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. पुणे मुंबई दरम्यान नव्याने महामार्ग बांधताना बहुतांश मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. यामुळे महामागार्मुळे निर्माण होणाºया रोजगारात स्थानिक तरुणांना प्राधान्य मिळणे गरजेचे असल्याची मागणी आहे.कंपनीने उर्से आणि सोमाटणे येथील टोल प्लाझावर ३० ते ४० स्थानिक तरुणांना रोजगार दिल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Puneपुणे