शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

गणरायाच्या आगमनानिमित्त वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी रस्त्यांचा वापर करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 12:25 IST

शहरात अनेक भागात पार्किंग व्यवस्था करण्यात येणार

पुणे: सार्वजनिक मंडळांसह घरगुती स्तरावरही येत्या साेमवारी व मंगळवारी (दि. १८ आणि १९) गणेशाची प्रतिष्ठापना हाेणार आहे. त्यासाठी बाजारात गणेशमूर्तीच्या खरेदीसाठी नागरिक या दिवशी सकाळी सहापासून ते रात्री १२ पर्यंत माेठी गर्दी करतात. त्यामुळे वाहतूककाेंडी हाेऊ नये, यासाठी वाहतूक विभागाने वाहतुकीत बदल केला आहे.

यंदा गणेशमूर्ती विक्रीचे बहुसंख्य स्टॉल हे डेंगळे पूल ते शिवाजी पुलादरम्यान श्रमिक भवनसमोर (अण्णा भाऊ साठे चौक) व कसबा पेठ पोलिस चौकी ते जिजामाता चौक ते मंडई तसेच सावरकर पुतळा ते समाधान भेळ सेंटर (सिंहगड रोड) पर्यंत आहेत. या परिसरातील नागरिकांची गैरसोय तसेच वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी या ठिकाणी वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे चालण्यासाठी पुढीलप्रमाणे बदल केले आहेत :

- हे दाेन दिवस शिवाजी रोड गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैया चौक वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहे. त्याला पर्यायी मार्ग हा गाडगीळ पुतळा चौकातून डावीकडे वळण घेऊन संताजी घोरपडे पथावरून कुंभारवेस चौक, शाहीर अमर शेख चौकमार्गे इच्छितस्थळी जाता येईल.

- शिवाजीनगरकडून शिवाजी रोडने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून डावीकडे वळण न घेता सरळ जंगली महाराज रोडने जावे.- झाशीची राणी चौक ते खुडे चौक ते डेंगळे पूलमार्गे कुंभारवेसकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी खुडे चौकामधून म.न.पा. पुणेसमोरून मंगला सिनेमा लेनमधून कुंभारवेस किंवा प्रीमिअर गॅरेज चौक शिवाजी पूल मार्गे जावे.

वाहतूक सुरू असलेले रस्ते 

- फडके हौद चौक ते जिजामाता चौक ते फुटका बुरुज- अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक ते मोती चौक, सोन्यामारुती चौक ते बेलबाग चौक ते सेवासदन चौक- अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक ते मोती चौक, सोन्या मारुती चौक ते बेलबाग चौक ते सेवासदन चौक- मंगला टॉकीजसमोरील प्रीमिअर गॅरेज लेनमधून कुंभार वेस सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर (सिंहगड रोड) गणपती विक्रीदरम्यान रस्त्याचे दोन्ही बाजूंकडील वाहतूक सुरू राहील, परंतु या टप्प्यामध्ये वाहने पार्क करू नये.

पार्किंग व्यवस्था

- मित्रमंडळ चौक ते पाटील प्लाझापर्यंत.- जमनालाल बजाज पुतळा ते पुरम चौक रस्त्याच्या डाव्या बाजूला- निलायम ब्रिज ते सिंहगड रोड जंक्शन- न्या. रानडे पथावर कामगार पुतळा चौक ते शिवाजी पुतळा या दरम्यान रस्त्याचे कोर्टाकडील एका बाजूस.- वीर संताजी घोरपडे पथावर म.न.पा. बिल भरणा केंद्र ते गाडगीळ पुतळा चौक या रस्त्याच्या दक्षिण बाजूस- टिळक पूल ते भिडे पूल दरम्यानचे नदीपात्रातील रस्त्यावर- मंडई येथील मिनर्व्हा व आर्यन पार्किंग तळावर- शाहू चौक (फडगेट चौकी चौक) ते राष्ट्रभूषण चौक, फक्त रस्त्याचे डाव्या बाजूस.

 

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सवGanpati Festivalगणेशोत्सवganpatiगणपतीTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस