शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

Pune Pedestrian Day 2024: पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्त्यावरील ‘पीएमपी’च्या मार्गात बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 10:40 IST

लक्ष्मी रस्त्यावर पादचारी दिनाच्या दिवशी वॉकिंग प्लाझा करण्यात आला असून सकाळी १० ते सायंकाळी ५ या बसमारंगात काळात बदल करण्यात आला आहे

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या वतीने बुधवारी (दि. ११) डिसेंबर रोजी पादचारी दिनाच्या दिवशी वॉकिंग प्लाझामुळे उंबऱ्या गणपती चौक ते गरूड गणपती चौकदरम्यान वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे लक्ष्मी रस्त्यावरून धावणाऱ्या पीएमपी बसच्या मार्गामध्ये सकाळी दहा ते सायंकाळी पाच या काळात बदल करण्यात आला आहे. महापालिकेकडून पादचारी दिनाच्या दिवशी लक्ष्मी रस्त्यावर वॉकिंग प्लाझाचे आयोजन केले जाते. हा रस्ता ‘नो व्हेईकल झोन’ केला झाते. त्यामुळे लक्ष्मी रस्त्यावरून नियमितपणे धावणाऱ्या बसच्या मार्गात बदल केला जाणार आहे.

असा आहे मार्गात बदल...

- बस मार्ग क्रमांक ५५, ५८, ५९ हे बस मार्ग शनिपारकडे येताना कुमठेकर रस्ता मार्गे नियमित मार्गाने व शनिपारकडून जाताना अप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, टिळक चौकातून पुढे नियमित मार्गाने संचलनात राहतील.- बस मार्ग क्रमांक ५७ या मार्गावरील बसेस पुणे स्टेशनकडून जाताना केळकर रस्ता, नारायण पेठ मार्गे टिळक चौक मार्गाने संचलनात राहतील.३) अटल पुण्यदशमचे बस मार्ग क्रमांक सात व नऊ तसेच बस मार्ग क्रमांक ८१, १४४, १४४अ, १४४क व २८३ या मार्गावरील बस पुणे स्टेशनकडे जाताना नियमित मार्गाने संचलनात राहतील.४) बस मार्ग क्रमांक १७४ या मार्गावरील बस पुणे स्टेशनकडून एनडीएकडे जाताना सिटी पोस्टपर्यंत नियमित मार्गाने व पुढे उजवीकडे वळून अप्पा बळवंत चौकच्या पुढे केळकर रस्ता मार्गाने नारायणपेठ, टिळक चौक व पुढे नियमित मार्गाने संचलनात राहतील.५) बस मार्ग क्रमांक १९७ व २०२ या मार्गावरील बस हडपसरकडून कोथरूड डेपो/वारजे माळवाडीकडे जाताना सिटी पोस्टपर्यंत नियमित मार्गाने व पुढे उजवीकडे वळून अप्पा बळवंत चौकच्या पुढे केळकर रस्ता मार्गाने नारायण पेठमार्गे टिळक चौक व पुढे नियमित मार्गाने संचलनात राहतील, तसेच कोथरूड डेपो/वारजे माळवाडीकडून हडपसरकडे येताना मार्गावरील बस नियमित मार्गाने संचलनात राहतील.६) बस मार्ग क्रमांक ६८ या मार्गावरील बस अप्पर डेपोकडे जाताना नियमित मार्गाने व अप्पर डेपोकडून सुतारदराकडे येताना टिळक रस्ता मार्गे संचलनात राहतील.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBus Driverबसचालकlakshmi roadलक्ष्मी रोडSocialसामाजिकPMPMLपीएमपीएमएल