शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात ATM मशीनमध्ये फेरफार, बँकेला गंडा घालण्याचा नवा प्रकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 22:23 IST

हरयाणाच्या दोघांना नागरिकांनी दिले पकडून

पुणे : एटीएम मशीनमध्ये फेरफार करुन त्यातून पैसे काढून ते न मिळाल्याचे दर्शवून बँकेला गंडा घालण्याचा नवा प्रकार उजेडात आला आहे. अशा प्रकारे पैसे काढणाऱ्या दोघांना नागरिकांनी पकडून डेक्कन पोलिसांच्या हवाली केले आहे. अ‍ॅपचा वापर करुन बँकेला गंडा घातल्याचे काही प्रकार नुकतेच पुणे शहरात घडले आहेत. याशिवाय हरयाणा, मुंबई, हैद्राबादमध्ये असे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. 

देवकरण दीपचंद प्रजापती (वय 27) आणि सर्फराज उमर मोहंमद (वय 26, दोघे रा़ हरियाना) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्वे रोड शाखेचे व्यवस्थापक संजय नलावडे यांनी डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, कर्वे रोडवरील पेट्रोल पंपावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम सेंटर आहे. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास प्रजापती व सर्फराज यांनी पैसे काढण्याच्या बहाण्याने एटीएम सेंटरमध्ये प्रवेश केला. त्यातील मशीनमध्ये काही फेरफार केले़ व त्यातून 60 हजार रुपये काढले़ यावेळी बाहेर थांबलेल्या एका नागरिकाला त्याचा संशय आला. त्यांनी इतरांना सांगितल्यावर सर्वांनी मिळून त्या दोघांना पकडून डेक्कन पोलिसांच्या ताब्यात दिले. डेक्कन पोलिसांनी दोघांना अटक करुन न्यायालयात हजर केले असताना अधिक तपासासाठी न्यायालयाने दोघांना 30 ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

असे करत होते फसवणूकप्रजापती आणि सर्फराज यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने हरियानामध्ये बँकेत खाते काढली आहेत. त्या खात्याच्या एटीएम कार्डद्वारे त्यांनी एटीएम सेंटरमधून पैसे काढले. त्यावेळी त्यांनी एका अ‍ॅपचा वापर केला जातो. त्यामुळे मशीन संदेश पुढे पाठवत नाही. पण एटीएममधून पैसे मात्र मिळतात. बँकेला पैसे दिल्याचा संदेश मिळत नसल्याने कार्डधारकाला पैसे मिळाले नसल्याचे दिसून येते. नंतर हे बँकेत जाऊन सांगतात. पैसे काढले तरी ते मिळाले नाही असा दावा करतात. ट्रॉन्झक्शन पूर्ण झाली नसल्याचे दिसत असल्याने बँकेकडून ते पैसे पुन्हा बँक खात्यात जमा होतात. त्यात बँकेला गंडा घातला जातो़ (याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून अधिक माहिती दिली नाही) तो चोरटा आणि बँक यांचा संबंध येत असल्याने इतरांना ते समजत नाही. एकाच वेळी प्रजापती आणि सर्फराज यांनी दोन तीन कार्ड वापरुन 60 हजार रुपये काढल्याने एका नागरिकाला संशय आला व त्यामुळे ते पकडले गेले. प्रजापती अणि मोहंमद यांनी अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय आहे. 

टॅग्स :atmएटीएमCrime Newsगुन्हेगारीPuneपुणे