शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंनी बेईमानी केली, आम्ही विधानसभेच्या २०० पेक्षा जास्त जागा जिंकू- चंद्रशेखर बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 13:20 IST

२०२४ मध्ये भाजप-सेना एकत्र युतीत निवडणुका लढेल....

पुणे : राज्यात येत्या काळात अनेक मोठे नेते भाजपमध्ये येतील. अनेकांना विश्वास बसणार नाही असे विरोधातील नेते पक्षात येतील असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. २०२४ मध्ये भाजप-सेना एकत्र युतीत निवडणुका लढेल, असंही ते म्हणाले. आज पुण्यात भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक होत आहे. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरेंना त्यांची माणसे संभाळता आली नाहीत. मुख्यमंत्री असताना ते स्वतःच्या पक्षातील अनेक नेत्यांनाही भेटत नव्हते. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर नवीन सरकार आले आहे. जुने सरकार गेल्यानंतर नवीन सरकार येणार. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे आलेले सरकार नैसर्गिक आहे. २०१९ मध्ये भाजप सेनेने एकत्र मते मागितली होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील असं मान्यही केले होते. पण सत्तेच्या लालसेपोटी मविआ सरकार स्थापन झाले होते. 

"भाजप-सेना विक्रमी जागा जिंकणार"-

उद्धव ठाकरेंनी बेईमानी केली म्हणून सध्याचे सरकार आले आहे. त्यांनी भाजपला दगा देऊन मविआ सरकार स्थापन केले होते. पण हे सरकार टिकू शकले नाही. अखेर हे सरकार पडून फडणवीस-शिंदे सत्तेवर आल्याचे बावनकुळे म्हणाले. राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, पवारांना कुणी राजीनामा मागितला होता हेच कळत नाही. हे एखाद्या वगनाट्यासारखे होते, अशी टिकाही त्यांनी केली. राज्यातील भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली लढणार आहे. भाजप-शिवसेना एकत्र येऊन २०० पेक्षा जास्त जागा जिंकतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे