शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याचे कारभारी होण्याचे चंद्रकांत पाटील यांचे स्वप्न भंगले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 12:42 IST

आशा धुळीस : आता आश्वासनांचे काय होणार ? 

ठळक मुद्देमाधुरी मिसाळ व लक्ष्मण जगताप यांच्या पदरीही निराशा

पुणे : भाजपचीच पुन्हा सत्ता येणार व राज्यातील क्रमांक दोनचे मंत्री आता कोथरूडमधून आमदार झाल्याने कोथरूडकरांसह पुण्याचे सर्व प्रश्न मार्गी लागतील असा दावा शहर भाजपने केला़. परंतु कोथरूडमधून विजयी झालेले व पुण्याचे कारभारी होण्याची मनीषा बाळगणारे चंद्रकांत पाटील यांचे स्वप्न पूर्णपणे भंगले गेले आहे़. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या महा विकास आघाडीचे सरकार आल्याने, पुण्यातून चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर दोन आमदारांची मंत्रिपदे हुकली गेली़. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापासूनच, भाजपने कोथरूडमधून आता चंद्रकांत पाटील आमदार होणार असल्याने शहराचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असाच प्रचार केला़. बाहेरचा उमेदवार म्हणून चंद्रकांत पाटील टीकेचे धनी झाले तरी पाटील हे पुण्याचेच आहेत हा प्रचार भाजपने सुरू ठेवला़. दरम्यानच्या काळात काहींनी तर चंद्रकांत पाटील हेच आता पुण्याचे कारभारी आहेत, असे सांगून पुढील गणिते बांधली़. परंतु, राज्यातील नाट्यमय घडामोडींमुळे पुण्याचा कारभारी होण्याचे स्वप्न कोल्हापूरच्या पाटलांना पूर्ण करता आले नाही व शहर भाजपवर बाहेरून लादलेली पाटीलकी हटली गेली आहे़. भाजपच्या एका खासदारानेच महापौरपदाच्या निवडणुकीदरम्यान दिल्लीवरून लादलेला उमेदवार असा पाटील यांचा नाव न घेता उल्लेख केला होता़. केंद्रात सत्ता आहे व राज्यात पुन्हा भाजपचीच सत्ता येणार या आत्मविश्वासात भाजप होती़. यामुळेच का होईना राज्यातील क्रमांक दोनचे मंत्री असलेले व तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील कोथरूड हा सुरक्षित मतदारसंघ निवडून विधानसभेत प्रवेश केला़. या प्रयत्नात त्यांनी कोथरूडकरांना अनेक भरभरून आश्वासने दिली़. विजयी झाल्यावर महिला भगिनींना साड्या वाटल्या़ तर कारभारी म्हणून कोथरूडसह पुण्यातील भाजपचे मताधिक्क्य कमी झाल्याने शहर पदाधिकाऱ्यांची कानउघाडणीही केली़. आपण पुण्याचे कारभारी असल्याने भासवून स्वत:कडे सत्ताकेंद्र घेतले, मात्र हे सर्व औटघटकेचेच ठरले़. त्यामुळे आता स्थानिक आमदार म्हणून चंद्रकांत पाटील कोथरूडकरांसह पुण्याला प्राधान्य देणार की प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षकार्याला प्राधान्य देणार हे आता उत्सुकतेचे ठरणार आहे़. ................माधुरी मिसाळ व लक्ष्मण जगताप यांच्या पदरीही निराशापुणे जिल्ह्यातून चंद्रकांत पाटील यांच्यासह पर्वती मतदारसंघातून हॅट्रिक करणाऱ्या पक्षाच्या शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांचीही मंत्रिपदाची संधी हुकली गेली़. तर पिंपरी-चिंचवड शहरातून मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या लक्ष्मण जगताप यांच्या पदरीही निराशा आली आहे़. ......

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाPoliticsराजकारणchandrakant patilचंद्रकांत पाटीलmadhuri misalमाधुरी मिसाळLakshman Jagtapलक्ष्मण जगताप