शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांसमोर पत्रांची सत्यता सिध्द करण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 21:56 IST

अटक आरोपींच्या घरझडतीमधून मिळालेल्या पत्रांमध्ये माओवाद्यांनी पैसा पुरविल्याबाबत तसेच राजीव गांधी यांच्या हत्येसारखा कट करण्याचा उल्लेख आहे, असे पोलिसांकडून न्यायालयात सांगण्यात आले आहे...

ठळक मुद्देसंशयित माओवादी : सुधा भारद्वाज यांच्या जामिनावर सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत न पाठविता नजरकैदेत

पुणे : माओवाद्यांची संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्यांकडे मिळालेल्या पत्रांची सत्यता पोलिसांनी आधी तपासावी. तोपर्यंत आरोपींना अंतरिम जामीन देण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांच्या वकिलांनी मंगळवारी सत्र न्यायालयात केली. त्यामुळे पोलिसांसमोर पत्रांची सत्यता सिध्द करण्याचे आव्हान असणार आहे.    अटक आरोपींच्या घरझडतीमधून मिळालेल्या पत्रांमध्ये माओवाद्यांनी पैसा पुरविल्याबाबत तसेच राजीव गांधी यांच्या हत्येसारखा कट करण्याचा उल्लेख आहे, असे पोलिसांकडून न्यायालयात सांगण्यात आले आहे. यातील आरोपी सुधा भारद्वाज यांच्या जामीनावरील सुनावणी विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांच्या न्यायालयात झाली. सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ युग चौधरी यांनी भारद्वाज यांच्यावतीने कामकाज पाहिले.       भारद्वाज यांनी गरीब, दलित, अदिवासी आणि अल्पसंख्याक समाजासाठी त्यांनी आपले जीवन वाहून घेतले आहे. या कामाची दखल घेत त्यांची केंद्र सरकारच्या विविध समित्यांवर नियुक्ती करण्यात आली होती. नजरकैदीची तरतूद सीआरपीसीमध्ये नाही. परंतु, भारद्वाजसह अन्य चौघांच्या स्वातंत्र्यावर गदा येऊ नये, यासाठी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत न पाठविता नजरकैदेत ठेवले. इंडियन एसोसिएशन आॅफ पीपल्स लायर्स (आयएपीएल) या वकिलांच्या संघटनेला माओवाद्यांची फ्रंट आॅर्गनायझेशन असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. माजी न्यायमूर्ती ठिपसे आणि न्या. शहा यांनी संघटनेच्या कार्यक्रमात भाषण केले आहे. त्यामुळे आता त्यांना अटक करणार का असा प्रश्न अ‍ॅड. चौधरी यांनी उपस्थित केला.        शस्त्रासाठी कोणाता मार्ग वापरला, ते कधी, केव्हा आणि कुठे वापरली याबाबत पोलिसांनी काहीही सांगितले नाही. याबाबत पोलीस यंत्रणा काही बोलत नाही. पोलीस केवळ पत्रांच्या आधारावर त्यांना या प्रकरणात गुंतवत आहे. एखादा वेडा माणूस देशाच्या नेतृत्वाला चोर आहे, असे म्हणत असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवणार का? त्याला काय पुरावे आहेत, अशी विचारणा होईल. आत्ताचे प्रकरण असेच आहे. ज्यामध्ये सहायक पोलीस आयुक्त दर्जाची व्यक्ती कोणताही भक्कम पुरावा नसताना गंभीर आरोप करीत आहे. 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयPoliceपोलिस