चाकणनजीक बेवारस मृतदेह
By Admin | Updated: May 9, 2014 22:06 IST2014-05-09T21:13:28+5:302014-05-09T22:06:13+5:30
एकतानगर येथील बंदूक घरासमोर पुणे-नाशिक महामार्गालगत एका ३० ते ३५ वयाच्या अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याची माहिती ठाणे अंमलदार उत्तम कांबळे यांनी दिली.

चाकणनजीक बेवारस मृतदेह
चाकण : एकतानगर येथील बंदूक घरासमोर पुणे-नाशिक महामार्गालगत एका ३० ते ३५ वयाच्या अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याची माहिती ठाणे अंमलदार उत्तम कांबळे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मृतदेह आज (ता. ९) सकाळी साडेदहा वाजता आढळला. एकतानगर येथील पीएमटी बसस्टॉपजवळ हातपाय व तोंडास मार लागलेल्या स्थितीत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. या इसमाचा रंग गोरा, केस कुरुळे, बांधा मजबूत व साधारण दाढी वाढलेली असून, मृतदेहाच्या खिशात निओटेक जे. पी. रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई येथून ५ मे २०१४ रोजी कॉम्प्युटर खरेदी केल्याची पावती सापडली आहे. या घटनेची खबर एका अज्ञात इसमाने फोनवरुन चाकण पोलीस स्टेशनला दिली असून, पोलीस निरीक्षक डी. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भास्कर लहासे तपास करीत आहेत.