विनामास्क फिरणाऱ्यांवर चाकण पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:08 IST2021-05-15T04:08:57+5:302021-05-15T04:08:57+5:30
खेड तालुक्यात मोठ्या संख्येने कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने चाकण शहरातील पुणे-नाशिक महामार्गावरील आंबेठाण चौक, तळेगाव चौक तसेच महात्मा फुले व ...

विनामास्क फिरणाऱ्यांवर चाकण पोलिसांची कारवाई
खेड तालुक्यात मोठ्या संख्येने कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने चाकण शहरातील पुणे-नाशिक महामार्गावरील आंबेठाण चौक, तळेगाव चौक तसेच महात्मा फुले व माणिक चौकात दुचाकी व चारचाकीमधून विनामास्क फिरणाऱ्यांवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी दंडत्माक कारवाई सुरू केली आहे. मागील तीन महिन्यांत चाकण पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्या एक हजार ५५६ केसेस करण्यात आल्या असून, त्यांच्याकडून ७ लाख ७८ हजार रुपये दंड वसूल केला आहे. ११४ आस्थापनांवर कारवाई करून दोन लाख १६ हजार रुपये, लग्न समारंभ पाच हजार रुपये, संचारबंदी व जमावबंदी उल्लंघन ३० हजार रुपये तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणे ३ हजार रुपये असा १०,१०५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी दिली.
१४ चाकण
चाकण येथील आंबेठाण चौकात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करताना पोलीस.