शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

चाकण नगरपरिषद निवडणूक : राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा विजय दावा; मात्र होणार ‘कांटे की टक्कर’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 12:22 IST

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) या दोन्ही प्रमुख पक्षांनी विजयी होण्याचा ठाम दावा केल्याने निवडणूक ‘कांटे की टक्कर’ होणार, अशी चिन्हे स्पष्ट दिसत आहे

चाकण : चाकण नगरपरिषद निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) या दोन्ही प्रमुख पक्षांनी विजयी होण्याचा ठाम दावा केल्याने निवडणूक ‘कांटे की टक्कर’ होणार, अशी चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. परंतु, भाजप आणि काँग्रेस पक्षांनीसुद्धा कंबर कसली आहे. मात्र, मतदार कोणाला पसंती देणार हे लवकरच कळणार आहे.

चाकण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरू असून, प्रत्येक गल्लीत-प्रत्येक बूथवर उमेदवारांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन प्रमुख पक्षात लढत होत आहे. परंतु, भाजपने नगराध्यक्ष पदासह बारा प्रभागात उमेदवार उभे केले आहेत. भाजप आणि काँग्रेस पक्षाची शहरात ताकत कमी असली तरी त्यांना कमी लेखून चालणार नाही, कारण विजयी उमेदवारांना याचा फटका बसू शकतो.

राष्ट्रवादीकडून विकासकामांचा मुद्दा पुढे केला जात असून, चाकणच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग आम्हीच दाखवला असल्याचा दावा केला आहे. भविष्यात राज्य सरकारच्या माध्यमातून शहरातील पाणी पुरवठा, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन यावर धोरणात्मक काम करणार असल्याची ग्वाही दिली जात आहे, तर शिंदेसेनेने आजवर राबवलेल्या विविध योजनांचा दाखला देत राज्य सरकारच्या पाठबळामुळे शहरात कोट्यवधी रुपयांची मोठी विकासकामे आम्ही केली असून पुढील काळातही चाकणला स्वच्छ - सुंदर चाकण करण्याचा नारा दिला आहे.

मतदार मात्र शांतपणे दोन्ही पक्षांचे प्रचार, भूमिका आणि उमेदवारांचा स्वभाव जाणून घेत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर वाढलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे उत्सुकता शिगेला पोहोचली असून, अखेरचा क्षणापर्यंत समीकरणे पालटण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील विकासाचे वादे सर्वच राजकीय पक्षांनी केले असले तरी तसा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही. यामुळे चाकण नगरपरिषद निवडणूक यंदा दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये थरारक होत असून, कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

पक्षीय पातळीवर प्रचारात भावनिक सूर -

पक्षनिष्ठा, जुने कार्यकर्ते, घराणेशाहीचे भांडवल, ''आपल्यावर केलेली उपकाराची आठवण’ अशा संदेशांनी मतदारांना भावनिकरीत्या बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, दुसरीकडे तरुण मतदार, कामधंद्यासाठी चाकणमध्ये स्थायिक झालेले नागरिक आणि प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारवर्गात विकासाची भाषा अधिक परिणामकारक

 दोन्ही शिवसेना एकत्र -

उद्धवसेनेकडून शिंदेसेनेला पाठिंबा -

उद्धवसेनेने अधिकृतपणे शिंदेसेनेला पाठिंबा जाहीर केला असून, संगनमताने उमेदवार दिल्याने स्थानिक पातळीवर दोन्ही गटांमध्ये एकीचे चित्र आहे.

 राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूत तयारी -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुकीसाठी सज्ज असून, चाकणचे माजी उपसरपंच यांच्या सुनेला नगराध्यक्षा पदाची उमेदवार म्हणून उभे केले आहे. राजकीय अनुभव, स्थानिक प्रश्नांची जाण आणि संघटनात्मक बळाच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू आहे.

राष्ट्रीय काँग्रेसचा अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न -

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत नगराध्यक्षा पदासह एका प्रभागात उमेदवार उभा करून अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. पारंपरिक मतदारांवर विसंबून काँग्रेसकडून जोरदार प्रचार मोहीम सुरू आहे.भारतीय जनता पक्षाची आक्रमक मोहीम

भारतीय जनता पक्षाने मागील काळात शहरात राबवलेल्या संघटन कौशल्यावर नगराध्यक्षा आणि नगरसेवक पदासाठी काही प्रभागात स्वतःचे उमेदवार उभे केले आहेत. स्थानिक नेतृत्व आणि संघटनाच्या आधारावर भाजप निवडणुकीत प्रभाव दाखवण्याच्या तयारीत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Chakan Municipal Council Election: Nationalist and Shiv Sena claim victory; Tight race

Web Summary : Nationalist Congress and Shiv Sena claim victory in the Chakan Municipal Council election, setting the stage for a tight race. BJP and Congress are also contesting, making the outcome uncertain.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेPMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२५Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूकLocal Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक