चाकण नगराध्यक्षा पूजा कड लवकरच विवाहबंधनात

By Admin | Updated: May 10, 2017 03:45 IST2017-05-10T03:45:22+5:302017-05-10T03:45:22+5:30

चाकण नगर परिषदेच्या विद्यमान नगराध्यक्षा व प्रसिद्ध वास्तुविशारद पूजा साहेबराव कड येत्या काही दिवसांतच विवाहबंधनात

Chakan may be married soon | चाकण नगराध्यक्षा पूजा कड लवकरच विवाहबंधनात

चाकण नगराध्यक्षा पूजा कड लवकरच विवाहबंधनात

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : चाकण नगर परिषदेच्या विद्यमान नगराध्यक्षा व प्रसिद्ध वास्तुविशारद पूजा साहेबराव कड येत्या काही दिवसांतच विवाहबंधनात अडकणार आहेत. चाकण येथील प्रसिद्ध उद्योजक साहेबराव राजाराम कड यांच्या त्या कन्या असून, पूजा कड यांचा साखरपुडा गुरुवारी (दि.११) आयोजित करण्यात आला आहे.
बाणेर येथील राष्ट्रीय कबड्डी खेळाडू व वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केलेले युवा उद्योजक किरण बाबूराव चांदेरे यांच्याशी पूजा यांचा नियोजित विवाह येत्या काही दिवसांत होणार आहे. पूजा व किरण यांचा साखरपुडा चाकण शिक्रापूर रस्त्यावरील भोसे (ता. खेड) येथील समृद्धी लॉन्समध्ये गुरुवारी (दि. ११) सायंकाळी सात वाजता होणार असल्याचे या सोहळ्याचे निमंत्रक शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव, खेडचे शिवसेनेचे आमदार सुरेश गोरे यांनी सांगितले.

Web Title: Chakan may be married soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.