शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची तुकडी शहरात दाखल; शहरात काढणार 'रुट मार्च'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 23:08 IST

लॉकडाऊन तसेच आगामी काळात येणारा रमजान ईद या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडल्यास खबरदारीचा उपाय

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये गेल्या ५३ हून अधिक दिवस शहर पोलिसांचा २४ तास रस्त्यावर बंदोबस्त

पुणे : लॉकडाऊन तसेच आगामी काळात येणारा रमजान ईद या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेसाठी राज्याने केंद्रीय सशस्त्र दलाच्या २० कंपन्यांची मागणी केली होती. त्या मागणीनुसार केंद्र सरकारकडूनपुणे शहरासाठी केंद्रीय सशस्त्र दलाची एक कंपनी पुण्यात बुधवारी रात्री दाखल झाली आहे. या कंपनीत १० अधिकारी व ११० जवान असून त्यांची एका महाविद्यालयात बुधवारी रात्री सोय करण्यात आली होती. मात्र, या सुविधेविषयी त्यांनी नाराजीव्यक्त केल्यानंतर त्यांना दुसरीकडे व्यवस्था करण्यात येत आहे. लॉकडाऊनमध्ये गेल्या ५३ हून अधिक दिवस शहर पोलीस २४ तास रस्त्यावर बंदोबस्त करीत आहेत. त्यात शहरात आतापर्यंत २१ पोलीस कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांच्याशी संपर्कात आलेल्या इतर कर्मचार्‍यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्याचवेळी शहरातील कोरोनाच्या रुग्णात मोठी वाढ होत आहे. अशावेळी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडल्यास खबरदारीचा उपाय म्हणून या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या कंपनीचा उपयोग करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील पाचही परिमंडळात त्यांचा मार्च काढण्यात येणार आहे. त्यादृष्टीने संबंधित परिमंडळाच्या पोलीस उपायुक्तांच्या सहकार्याने हा रुट मार्च काढण्यात येणार आहे. गुरुवारी शहरातील प्रतिबंधित भागाच्या बाहेरुन असा रुट मार्च काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, दुपारनंतर अचानक आलेल्या पावसामुळे हा मार्च काढण्यात आला नसल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसCentral Governmentकेंद्र सरकार