शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने गेल्या वर्षभरात केली दीड कोटी रुपयांची वीज बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 6:50 PM

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने विविध माध्यमातून मागील वर्षभरात सुमारे दीड कोटी रुपयांची बचत केली आहे. पारंपरिक वीज उपकरणांऐवजी एलईडी दिवे तसेच सौर उर्जेच्या वापरातून ही किमया साधण्यात आली आहे.

ठळक मुद्देपारंपरिक वीज उपकरणांच्या जागी वाढविला जात आहे एलईडी दिवे तसेच सौर उर्जेचा वापरउभारण्यात येणार १.२ मेगावॅट क्षमतेचे सौरउर्जा प्रकल्प, १७ लाख ५२ हजार युनिटची होईल बचत

पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने विविध माध्यमातून मागील वर्षभरात सुमारे दीड कोटी रुपयांची बचत केली आहे. पारंपरिक वीज उपकरणांऐवजी एलईडी दिवे तसेच सौर उर्जेच्या वापरातून ही किमया साधण्यात आली आहे.वीज बचतीसाठी पुणे विभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्याअनुषंगाने मागील वर्षभरात विविध उपाययोजना करण्यात आल्या. याविषयी विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी माहिती दिली. पारंपरिक वीज उपकरणांच्या जागी एलईडी दिवे तसेच सौर उर्जेचा वापर वाढविला जात आहे. समपार फाटकांवर सौर एलईडी, आरक्षण तसेच बुकिंग कार्यालयांमध्ये सौर युपीएस आणि कोल्हापूर, मिरज तसेच घोरपडी येथील रनिंग रूममध्ये सोलर वॉटर हिटर बसविण्यात आले आहे. त्यामुळे १४ लाख ५४ हजार युनिटची वीज बचत झाली आहे. त्यामुळे विभागाला वर्षभरात १ कोटी ४५ लाख ४५ हजार रुपयांचा फायदा मिळाला आहे.सौर उर्जेच्या माध्यमातून रेल्वे स्थानक तसेच परिसरात दिवे, पंखे आदी विद्युत सुविधा केल्या जात आहेत. त्यासाठी विभागात दोन सौर उर्जा प्रकल्प सुरू करण्यात आले आहे. पुणे रेल्वे स्थानकावर ‘सीएसआर’ अंतर्गत १६० किलोवॅट क्षमतेचा तर दौंडज स्थानकावर १० किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पातून वीज निर्मिती केली जात आहे. तसेच स्थानक व कार्यालयांमध्ये सर्व पारंपरिक उपकरणांच्या जागी नवी अत्याधुनिक उपकरणे बसविली जाणार आहेत. त्यामुळे ७ लाख ३१ हजार युनिटची बचत अपेक्षित आहे. तसेच पुढील काळात विभागात विविध ठिकाणी एकुण १.२ मेगावॅट क्षमतेचे सौरउर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यामुळे १७ लाख ५२ हजार युनिटची बचत होईल. त्यामुळे रेल्वेला १ कोटी ४७ लाख रुपयांचा फायदा होणार असल्याचे देउस्कर यांनी सांगितले.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेPuneपुणे