शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी केंद्रीय कायद्याची ‘आयएमए’ची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 20:08 IST

शहरातील काही रूग्णालय, क्लिनिक, दवाखाने यांच्या वैद्यकीय सेवा (अत्यावश्यक सेवा वगळता) 24 तासासाठी बंद ठेवण्यात आल्या होत्या. 

ठळक मुद्देगेल्या वर्षभरात पुण्यात 501 डॉक्टरांना धमक्या दिल्याच्या तक्रारी, 10 डॉक्टरांवर शारीरिक हल्लेदिवसागणिक डॉक्टरांवरील शाब्दिक अत्याचार आणि मारामारीच्या घटना

पुणे : कोलकात्ता येथील एन.आर.एस महाविद्यालयाच्या रूग्णालयातील डॉक्टरांवरील हल्ला तसेच भारतभर डॉक्टरांवर होणारे अमानुष हल्ले रोखण्यासाठी एकच केंद्रीय कायदा करावा तसेच डॉक्टरांचे खटले ‘फास्ट ट्रक’ न्यायालयात चालवावेत अशा मागण्या इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे करण्यात आल्या आहेत. डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमएतर्फे  सोमवारी पुकारलेल्या बंदला पुण्यात वैद्यकीय संघटना आणि रूग्णालयांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील काही रूग्णालय, क्लिनिक, दवाखाने यांच्या वैद्यकीय सेवा (अत्यावश्यक सेवा वगळता) 24 तासासाठी बंद ठेवण्यात आल्या होत्या. आयएमएच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांवरील हल्ल्याच्या गंभीर परिस्थितीबाबत विचार विनिमय करून ठोस उपाययोजना करण्यासाठी सोमवारी एक बैठक घेण्यात आली. या  बैठकीमधील निर्णयासंदर्भात पत्रकारांना माहिती देण्यात आली. यावेळी सर्व वैद्यकीय संघटनांचे प्रमुख डॉ. अविनाश भोंडवे, डॉ. संजय गुप्ते, डॉ. जयंत नवरंगे, डॉ, अविनाश भुतकर, डॉ. दिलीप सारडा, आयएमचे डॉ. आरती निमकर, डॉ. बी.एल देशमुख, डॉ. मीनाक्षी देशपांडे, डॉ. आशुतोष जपे उपस्थित होते. गेल्या वर्षभरात पुण्यात 501 डॉक्टरांना धमक्या दिल्याच्या तक्रारी असून, 10 डॉक्टरांवर शारीरिक हल्ले झाले आहेत. दिवसागणिक डॉक्टरांवरील शाब्दिक अत्याचार आणि मारामारीच्या घटना घडत आहेत. पण प्रत्येकाची नोंद होत नाही. आता या घटना नोंद करण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याचे डॉ. संजय पाटील यांनी सांगितले.’आम्ही तुम्हाला पैसे मोजतो म्हणजे तुम्ही आम्हाला सेवा द्यायलाच पाहिजेत अशी एक मानसिकता निर्माण झाली आहे. समाजात हिंसकता वाढत आहे. पूर्वी डॉक्टरांना देव मानले जायचे पण आता त्यांना मारायला देखील लोक कमी करीत नाही. हेच डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी एकच सेंट्रल कायदा करावा. या कायद्याअंतर्गत 7 ते 14 वर्षाच्या शिक्षेची तरतूद असावी. ज्यायोगे हल्लेखोरांवर वचक बसू शकेल अशा आमच्या मागण्या असल्याचे डॉ. अविनाश भोंडवे यांनी स्पष्ट केले.इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे शाखेसोबत सर्वच स्पेशालिस्ट डॉक्टर्स, छोटी मोठी रूग्णालये तसेच सर्व वैद्यकीय संघटना उदा: पुणे स्त्रीरोग तज्ञ संघटना, पुणे नेत्रतज्ञ संघटना, बालरोग तज्ञांची संघटना, असोसिएशन आॅफ फिजिशियन पुणे आदी विविध वैद्यकीय संघटनांनी वैद्यकीय सेवा 24 तास बंद ठेवून सक्रिय पाठिंबा दर्शविला असल्याचे सांगण्यात आले. --------------------------------------------  

टॅग्स :Puneपुणेdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय