शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

केद्रांच्या पथकाचे 'वरातीमागून घोडे' ; तब्बल तीन महिन्यांनंतर अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 12:02 IST

तीन महिन्यांनंतर पथक दौऱ्यावर येत असल्याने नुकसान झाल्याचे कसे दावणार जिल्हा प्रशासनासमोर पेच 

पुणे : राज्यात ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पुणे विभागात प्रामुख्याने पुणे, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाकडे ऐवढा निधी नसल्याने केंद्राकडे निधीची मागणी करण्यात आली होती. यावरून बरेच राजकारण देखील झाले. अखेर केंद्र शासनाने ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी एक पथक पुणे विभागाच्या दौऱ्यावर पाठवले आहे. तब्बल तीन महिन्यांनंतर हे पथक येत असल्याने नुकसान झालेले नक्की काय दाखविणार असा मोठा प्रश्न जिल्हा प्रशासनासमोर उभा राहिला आहे. 

पुणे विभागात 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 87 हजार 416 हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावरील शेत पिकांचे नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक फटका सोलापूर,  पुणे आणि सांगली जिह्याला बसला. मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली. विभागात तब्बल 1 हजार 29  जनावरे पाण्यात वाहून गेली. या सर्व नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक पुणे विभागाच्या दौऱ्यावर आले आहे. बुधवार दि.23 रोजी हे पथक पुणे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून विभागीय आयुक्त कार्यालयात संपूर्ण विभागाचा आढावा घेणार आहे. पथक तब्बल तीन महिन्यांनंतर येत आहे. नुकसान झालेल्या भागाची शेतकऱ्यांकडून दुरूस्ती, डागडुजी करण्यात आली आहे. यामुळेच प्रशासनासमोर केंद्रीय पथकाला नक्की काय दाखवायचे व त्यावेळी आलेल्या प्रलयाची तीव्रता कशी कळणार प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीRainपाऊसCentral Governmentकेंद्र सरकार