शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

‘स्मार्ट सिटी’चा निधी देण्यास केंद्राचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 10:15 PM

काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी स्मार्ट सिटीचा पुढील निधी देण्यास केंद्र सरकारने महापालिकेला नकार दिला आहे का ? असा प्रश्न सभेत विचारला. प्रशासनाने त्यावर गुळमुळीत उत्तर दिले.

ठळक मुद्देमागील निधीचा हिशोब नाही: फक्त २० टक्केच निधी खर्च

पुणे: पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला स्मार्ट सिटी योजनेचा पुढील वर्षाचा निधी देण्यास केंद्र सरकारने महापालिकेला नकार दिला आहे. महापालिका प्रशासनानेच सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ही माहिती दिली. याबाबतचा सविस्तर अहवाल पुढील सभेत सादर करावा, असा आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी यावेळी दिला.काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी स्मार्ट सिटीचा पुढील निधी देण्यास केंद्र सरकारने महापालिकेला नकार दिला आहे का ? असा प्रश्न सभेत विचारला. प्रशासनाने त्यावर गुळमुळीत उत्तर दिले. त्यावर शिंदे यांनी केंद्र सरकारचे ते पत्र आपल्याकडे आहे असे सांगितले.ते पत्र वाचून दाखवू का अशी विचारणा केली. त्यांनी पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारला. तसेच पत्र सर्वसाधारण सभेपासून लपवले गेले असा आरोप करताना अपेक्षेपेक्षा कमी काम झाले असल्याची टीका या पत्रात आहे का असा प्रश्न उपस्थित केला.      आयुक्त व स्मार्ट सिटी कंपनीचे संचालक कुणाल कुमार यावेळी उपस्थित होते. मात्र, या प्रश्नांना अतिरिक्त आयुक्त शीतल उगले-तेली यांनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या,आतापर्यंत दिलेल्या निधीच्या खर्चाची माहिती पाठवल्यानंतर निधी मिळेल, निधी देणार नाही असे कळवण्यात आलेले नाही या प्रकल्पाविषयीच्या कामाची अधिकची माहिती जमा करण्याचे काम सुरू आहे असे त्यांनी सांगितले. शिंदे यांनी त्यावर प्रत्युत्तर करताना आतापर्यंत २० टक्केच निधी खर्च झाला आहे,त्याची माहिती देखील केंद्राकडे पाठविण्यात आली नसल्यामुळे पुन्हा निधी देण्यास नकार मिळाला आहे.आयुक्त कुणाल कुमार यांनीही ते मान्य केले. त्यांनी सांगितले, माहिती पाठवल्यानंतर निधी मिळेल असे सांगत त्यांनी या प्रश्नांवर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :Puneपुणेkunal kumarकुणाल कुमारMukta Tilakमुक्ता टिळक