केंद्रसरकारतर्फे केवळ उद्योगपतींच्या हिताचे निर्णय : दिलीप वळसे पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:06 IST2021-02-05T05:06:35+5:302021-02-05T05:06:35+5:30
कुकडी डाव्या कालव्यावर (चोंभूत) येथून नदीला पाणी सोडण्यासाठी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या मदतीमधून बांधण्यात आलेल्या विमोचनद्वाराचे उद्घाटन ...

केंद्रसरकारतर्फे केवळ उद्योगपतींच्या हिताचे निर्णय : दिलीप वळसे पाटील
कुकडी डाव्या कालव्यावर (चोंभूत) येथून नदीला पाणी सोडण्यासाठी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या मदतीमधून बांधण्यात आलेल्या विमोचनद्वाराचे उद्घाटन दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पोपटराव गावडे होते. या वेळी आमदार नीलेश लंके, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेरचे सभापती प्रशांत गायकवाड, आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, उपविभागीय अधिकारी संतोपकुमार देशमुख, तहसीलदार लैला शेख, जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर जांभळकर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील, कुकडीचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर, उपविभागीय अधिकारी सुहास साळवे, पंचायत समितीच्या सदस्या अरुणा घोडे, माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव जोरी, जांबूतच्या माजी सरपंच डॉ. जयश्री जगताप आदी उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले की, कोरोनामुळे सामान्य माणसाबरोबरच राज्य सरकारलाही मोठी आर्थिक कारणाने कसरत करावी लागत आहे. अशा स्थितीतही जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. त्याचाच भाग म्हणजे कृषिपंपांना वीजबिलात मोठ्या सवलतीची योजना सुरू करण्यात आली. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.
माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले की, भीमाशंकर कारखान्याने आर्थिक मदत करून बांधलेल्या या विमोचनद्वारामुळे सहा बंधाऱ्यांमधील आठ गावांतील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम यांनीही मनोगत व्यक्त केले.
फोटो ओळी : कुकडी डाव्या कालव्यामधुन कुकडी नदीत पाणी सोडण्यासाठी विमोचन दरवाजाचे उद्घाटन करताना राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीपराव वळसे पाटील, आमदार नीलेश लंके माजी आमदार पोपटराव गावडे, देवदत्त निकम, सुनीता गावडे.