केंद्र सरकाच्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:27 IST2020-12-13T04:27:06+5:302020-12-13T04:27:06+5:30
बारामती : इंधन दरवाढ व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ बारामती येथील भिगवण ...

केंद्र सरकाच्या
बारामती : इंधन दरवाढ व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ बारामती येथील भिगवण चौकता शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. नायब तहसीलदार धनंजय जाधव यांना निवेदन देण्यात आले.
केंद्रातील भाजप सरकार व रावसाहेब दानवे यांच्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली याप्रसंगी जिल्हाप्रमुख अॅड. राजेंद्र काळे यांनी वाढलेल्या इंधनवाढीचा सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.असे म्हणाले. यावेळी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब शिंदे तालुकाध्यक्ष विश्वास मांढरे शहर प्रमुख पप्पू माने, राजेंद्र पिंगळे , निलेश मदने महिला आघाडी सुमित खोमणे संगीता पोमने युवा सेनेचे निखिल देवकाते, गणेश कारंजे, सुदाम गायकवाड, अँड अजित जगताप, रंगा निकम, रमेश खलाटे, राजेंद्र साळुंके, दत्ता लोणकर उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करताना शिवसैनिक .
१२१२२०२०-बारामती-२४