‘रक्ततुला’ करून दिव्यांगांकडून केंद्राचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:14 IST2021-08-28T04:14:26+5:302021-08-28T04:14:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रेल्वे संरक्षण दल, पोलीस दल यातील सरकारी नोकऱ्यांमध्ये दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या चार टक्के आरक्षणाचा ...

Center protests by Divyangs by ‘Raktatula’ | ‘रक्ततुला’ करून दिव्यांगांकडून केंद्राचा निषेध

‘रक्ततुला’ करून दिव्यांगांकडून केंद्राचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : रेल्वे संरक्षण दल, पोलीस दल यातील सरकारी नोकऱ्यांमध्ये दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या चार टक्के आरक्षणाचा कोटा केंद्र सरकारने रद्द केला आहे. याविरोधात पुण्यात दिव्यांगांनी आंदोलन करत निर्णय मागे घेण्याची मागणी केली. गांधीगिरी करत काही दिव्यांगांनी रक्तदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची ‘रक्ततुला’ केली.

दिव्यांगांचे सरकारी नोकरीतील चार टक्के आरक्षण रद्द करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. या संदर्भातील अधिसूचना १८ ऑगस्ट २०२१ रोजी प्रसिद्ध केली आहे. या निर्णयामुळे देशातील लाखो दिव्यांगांना फटका बसणार आहे. आधीच कोरोनामुळे दिव्यांगांचे रोजगार गेले आहेत. उद्योग बुडाले आहेत. सरकारी नोकऱ्यांमधील दिव्यांगांच्या हजारो जागांचा अनुशेष भरलेला नाही. त्यातच आरक्षण रद्द केल्याने अन्याय होणार असल्याचे दिव्यांगांचे म्हणणे आहे.

प्रहार अपंग क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली रक्ततुला आंदोलन करण्यात आले. दिव्यांग कल्याण उपायुक्त संजय कदम यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले. संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष सुरेखा ढवळे, जिल्हा अध्यक्ष सुप्रिया लोखंडे, बाबा पाडुळे, सुरेश पाटील, शिवाजी शिंदे, जीवन टोपे, अनिल मेमाने, दशरथ शिंदे, रफीक खान, बाळू काळभोर आदी उपस्थित होते.

फोटो : केंद्र सरकारने सरकारी नोकरीतील दिव्यांगांचे चार टक्के आरक्षण रद्द केल्याने पुण्यात दिव्यांग बांधवांनी आंदोलन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची या वेळी रक्ततुला करून निषेध नोंदविला.

Web Title: Center protests by Divyangs by ‘Raktatula’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.