शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भोर येथे दगड चुकविण्याच्या प्रयत्नात सिमेंट काँक्रिटचा मिक्सर कालव्यात,एक जण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 20:48 IST

करंजे गावाजवळ नीरादेवघर धरणाच्या उजव्या कालव्याच्या भरावावरील दगड चुकविताना सिमेंट काँक्रिटचा मिक्सर ३० फूट खोल कालव्यात पडून ही दुर्घटना घडली.

ठळक मुद्देचालकाने उडी मारल्याने तो बचावलामृताच्या नातेवाईकांचा काही काळ गोंधळ करून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

भोर : करंजे (ता. भोर) गावाजवळ नीरादेवघर धरणाच्या उजव्या कालव्याच्या भरावावरील दगड चुकविताना सिमेंट काँक्रिटचा मिक्सर ३० फूट खोल कालव्यात पडून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार व दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी सकाळी ७ वाजता घडली.याबाबत राम किसनराव साळुंके (वय ४४) याने फिर्याद दिली आहे. या अपघातात दलित विष्णू व्यवहारे (वय ३२, रा. कंदार, जि. नांदेड, सध्या रा. निगुडघर, ता. भोर) याचा जागीच मृत्यू झाला. नरसिन्ना कृष्णय्या व सिन्नू वेंकटय्या गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरादेवघर धरणाच्या उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या काँक्रिटचे काम सुरू आहे. हे काम आर. बी. घोडके यांनी घेतले आहे. या कामासाठी लागणारे काँक्रिट नाटंबी येथे मिक्सिंग केले जात आहे. ते मिक्सर (टीएम एमएच २२ एन २८०३) मध्ये भरून आज सकाळी मिक्सर कालव्याच्या कडेने चालक पंढरीनाथ जळवा व्यवहारे (रा. बोरी, ता. कंदार, जि. नांदेड) करंजे गावाच्या पाठीमागील बाजूस काम सुरू असलेल्या ठिकाणी घेऊन जात होता. या वेळी कालव्याच्या भरावावर असणारा दगड चुकविण्याच्या प्रयत्नात मिक्सर कालव्याच्या बाजूला जाऊन दोन वेळा उलटून ३० फूट खोल कॅनॉलमध्ये पडला. यावेळी चालकाने उडी मारल्याने तो बचावला, मात्र केबिनमध्ये बसलेले दलित विष्णू व्यवहारे ठार झाले. नरसिन्ना कृष्णय्या व सिन्नू वेंकटय्या गंभीर जखमी झाले आहेत. सुपरवायझर राम साळुंके यांनी जखमींना बाहेर काढून भोर उपजिल्हा रुग्णालयात आणले.दरम्यान, मृताच्या नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात काही काळ गोंधळ करून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. मात्र कंपनीच्या मालकाशी संवाद झाल्यावर हे प्रकरण निवळले.   

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातDeathमृत्यू