शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदरच्या विद्याथिर्नींचा रशियात मराठमोळा गणेशोत्सव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 15:35 IST

गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे. भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषत: महाराष्ट्र राज्यात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होतो.

ठळक मुद्देयापुढे आम्ही सगळे येथे एकत्र येऊन शक्य तेवढे सण साजरा करण्याचा प्रयत्न करणार

पुरंदर : भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषत: महाराष्ट्र राज्यात गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व उत्सव होतात. केवळ भारतातच नव्हे तर जगभरामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. परंतु शिक्षण,व्यापार,नोकरी आदी कारणाने अनेक भारतीय परदेशात जातात. पुरंदर तालुक्यातील विद्यार्थिनीं रशियात उच्चशिक्षणासाठी गेल्या असताना त्यांनी भारतीय परंपरेनुसार त्याठिकाणी गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना करत गणेशोत्सव साजरा करतात. गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे. भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषत: महाराष्ट्र राज्यात गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व उत्सव होतात. केवळ भारतातच नव्हे तर जगभरामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. परंतु, या प्रत्येकाची मराठमोळ्या संस्कृती, सणांशी जोडली गेलेली नाळ सोबत जपण्याचा प्रयत्न केला जातो. आज अनेक भारतीय कुटुंबे परदेशात राहत आहेत.तेथे गणेश चतुर्थीच्या दिवशी घरगुती स्वरूपात गणेशमूर्तीची स्थापना करून विधिवत पद्धतीने पूजा करून परंपरेनुसार त्याचे विसर्जन केले.पुरंदर तालुक्यातील काजल चौंडकर (नायगाव), काजल भिंताडे(भिवडी),ऋतुजा कुंभारकर(वनपुरी),सायल जगताप(जेजुरी),आर्या पाटील (धनकवडी) ह्या मुली उच्च वैद्यकीय शिक्षण रशिया येथे घेत आहेत. परदेशात शिकत विद्यार्थिनींना असलेल्या या गणेश चतुर्थीला सुट्टी मिळत नसल्यामुळे या उत्सवासाठी भारतात परत येता आले नाही. मात्र, गणपती विषयी असणारी ओढ त्यांना स्वस्त बसू देत नव्हती.यामुळेच गणेशोत्सव साजरा करण्यासाठी या विद्यार्थिनींनी गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांच्या तेथील राहत्या घरी गणेश मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करत आपण कोठेही असोत मनात भक्तिभाव असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही, हे या विद्यार्थिनींनी दाखवून दिले आहे. आम्हाला देशाची व येथील सण उत्सवांची खूपदा आठवण येत असते. त्यामुळे यापुढे आम्ही सगळे येथे एकत्र येऊन शक्य तेवढे सण साजरा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. गणपती बाप्पाचे आशीर्वाद सदैव लाभावे हीच आमची इच्छा आहे.भारताची संस्कृती परदेशात देखील जपण्याचे प्रयत्न करत असल्याचे काजल चौंडकर हिने सांगितले .                       

टॅग्स :PurandarपुरंदरGaneshotsavगणेशोत्सवrussiaरशियाStudentविद्यार्थी