नादब्रह्माची अनुभूती देणारा सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2016 02:13 IST2016-02-08T02:13:29+5:302016-02-08T02:13:29+5:30

पवित्र इंद्रायणीच्या घाटावर जमलेला ९ हजार ३३ तबला व मृदंगवादकांचा अनोख्या ‘नादब्रह्मा’ची अनुभूती रविवारी आली.

A celebration of sensationalism | नादब्रह्माची अनुभूती देणारा सोहळा

नादब्रह्माची अनुभूती देणारा सोहळा

आळंदी : पवित्र इंद्रायणीच्या घाटावर जमलेला ९ हजार ३३ तबला व मृदंगवादकांचा अनोख्या ‘नादब्रह्मा’ची अनुभूती रविवारी आली. कर्णमधुर नाद, घाटावरचे नयनरम्य दृश्य पाहून अलंकापुरीच्या घाटावर भक्तीचा मेळा जमल्याची अनुभूती हजारोंच्या संख्येने जमलेल्या येत होती. हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.
निमित्त होते पखवाज व मृदंगवादकांच्या संमेलनाचे. माईर्स एमआयटी, अखिल भारतीय मृदंगाचार्य संघटना आणि श्रीक्षेत्र आळंदी, देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हे पहिलेच संमेलन भरविण्यात आले होते.
आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असल्यामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व होते.
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कीर्तनकार हभप श्री. बाबामहाराज सातारकर, थोर आध्यत्मिक गुरू स्वामी परिपूर्णांनंद, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, पद्मश्री प्रा. डॉ. येल्ला व्येंकटश्वरा, ख्यातनाम बासरीवादक अमित काकडे हे विशेष सन्माननीय पाहुणे व्यासपीठावर विराजमान होते .
श्री क्षेत्र आळंदी येथील विकासकामांची पूर्तता आणि विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक-अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याचे औचित्य साधून या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राहुल कराड यांनी प्रास्ताविक केले . याप्रसंगी गरीब व होतकरू पखवाजवादक वारकरी विद्यार्थ्यांना विश्व शांती केंद्राच्या वतीने ७५ पखवाज भेट म्हणून देण्यात आले. यातील प्रातिनिधिक स्वरूपातील पखवाज आळंदी येथील ज्योतिराम काटे या बालवारकऱ्याला देण्यात आला. अखिल भारतीय पखवाज व मृदंग संमेलनाच्या निमित्ताने भारतातून ज्ञानेश्वरीच्या जेवढ्या ओव्या आहेत तेवढेच ९ हजार ३३ मृदंग व पखवाजवादकांनी एकाच मंचावर येऊन आपली सेवा सादर केली.
नादब्रह्माची अनुभूती देणारा हा एक अलौकिक सोहळा असेल. वारकरी संप्रदायामध्ये पखवाज, मृदंग, वीणा व टाळ या वाद्यांना विशेष महत्त्व आहे.
या मृदंग संमेलनात भाग घेणाऱ्या मृदंगाचार्यांना संस्थेच्या वतीने माऊली व जगद्गुुरूंची प्रतिमा असलेली शाल, माऊलींची प्रतिमा, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
(वार्ताहर)

Web Title: A celebration of sensationalism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.