जेतवन बुद्ध विहारात बुद्ध पौर्णिमा साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:09 IST2021-05-27T04:09:52+5:302021-05-27T04:09:52+5:30

बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज, सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्याबाई होळकर, लोकशाहीर ...

Celebration of Buddha Pournima at Jetavan Buddha Vihara | जेतवन बुद्ध विहारात बुद्ध पौर्णिमा साजरी

जेतवन बुद्ध विहारात बुद्ध पौर्णिमा साजरी

बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज, सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्याबाई होळकर, लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे या महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन शहरात अभिवादन करण्यात आले.

या वेळी इंदापूर टायर असोसिएशनचे विशेष सल्लागार तथा समता सैनिक दलाचे पुणे जिल्हाध्यक्ष अशोकराव पोळ व टायर असोसिएशनचे खजिनदार रुपेश शिंदे, शिवाजी मखरे, अकिलभाई मोमीन यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या वेळी समता सैनिक दलाचे ज्येष्ठ कमांडर माणिक सूर्यवंशी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जयकुमार सोनवणे, मोहन शिंदे, धनंजय सोनवणे, महेश मखरे, सादिकभाई मोमीन, सलिमभाई काझी, तर इंदापूर टायर असोसिएशनचे सदस्य प्रकाश (तात्या) शिंदे, बापूराव जाधव, कार्यकारी संचालक शकील शेख हे उपस्थित होते.

इंदापूर येथील जेतवन बुद्ध विहारात बुद्ध पौर्णिमा साजरी करताना मान्यवर.

Web Title: Celebration of Buddha Pournima at Jetavan Buddha Vihara