पेरिविंकलच्या शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा केला पर्यावरण दिन साजरा करून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:12 IST2021-06-09T04:12:49+5:302021-06-09T04:12:49+5:30
-- पिरंगुट : चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलच्या बावधन, सूस, पिरंगुट व पौड या चारही शाखांमध्ये जागतिक ...

पेरिविंकलच्या शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा केला पर्यावरण दिन साजरा करून
--
पिरंगुट : चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलच्या बावधन, सूस, पिरंगुट व पौड या चारही शाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, तर या निमित्ताने पेरीविंकल शाळेच्या २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा हा जागतिक पर्यावरण दिनी या पर्यावरणाचा समतोल राखून करण्यात आला.
या प्रसंगी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलच्या चारही शाखांमध्ये वड, पिंपळ, उंबर, चिंच अशा विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, मुख्याध्यापिका नीलिमा व्यवहारे, निर्मल पंडित, रूचिरा खानविलकर, अभिजित टकले,पर्यवेक्षिका शिल्पा क्षीरसागर,पूनम पांढरे,सना इनामदार, नायर आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यानी देखील त्यांच्या घरामध्ये, बागेमध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरात प्रत्येकी एक झाड लावावे तसेच पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटे तयार करून झाडावर किंवा बाहेर सुरक्षित स्थळी ठेवून त्यांना आसरा देत पर्यावरणाचा समतोल राखण्याचे व मदत करण्याचे आवाहन संस्थेच्या मान्यवरांच्या वतीने विद्यार्थ्यांना करण्यात आले.
---
फोटो क्रमांक : ०७ पिरंगुट पेरिविंकल स्कूल
फोटो ओळ : पेरिविंकल स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.