राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाचा वर्धापन दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:11 IST2021-03-15T04:11:23+5:302021-03-15T04:11:23+5:30
धनकवडी : पुणे शहराचे वैभव असलेल्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाचा २२ वा वर्धापनदिन कर्तव्यनिष्ठ महिला मंचने कोविडच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा ...

राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाचा वर्धापन दिन साजरा
धनकवडी : पुणे शहराचे वैभव असलेल्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाचा २२ वा वर्धापनदिन कर्तव्यनिष्ठ महिला मंचने कोविडच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा केला.
प्राणिसंग्रहालय पेशवे पार्कहून कात्रजला स्थलांतरीत होऊन तब्बल बावीस वर्षे झाली. गेल्यावर्षी कर्तव्यनिष्ठ महिला मंचने एकविसावा वर्धापन दिन प्राणिसंग्रहालयातील वन्यजीव पालक आणि कर्मचाऱ्यांच्या हस्ते केक कापून साजरा केला होता. कोराेनामुळे वर्षभर प्राणिसंग्रहालय बंद राहिल्यामुळे मोठा महसूल बुडाला आहे.
एकत्रित वन्यजीवांचा पालन पोषणाचा ताण महापालिकेवर वाढला आहे. त्यामुळे यंदा वर्धापन दिन साजरा करताना प्राणी दत्तक योजनेला गती देण्यासाठी महिला मंच, अनाहत स्वराज्य आणि राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाने पुढाकार घेतला आहे. त्यांनी वर्गणी काढून एक महिन्यासाठी बिबट्या दत्तक घेतला. या सर्व सामाजिक संस्थांनी प्राणी दत्तक घेण्याचे अावाहन केले.
प्राणिसंग्रहालयाच्या पशुसंवर्धन वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचित्रा सूर्यवंशी यांच्या हस्ते केक कापण्यात आला. कोविडच्या पार्श्वभूमीवर मर्यादित संखेने महिला उपस्थित राहिल्या. मास्क परिधान करून, सामजिक अंतराचे काटेकोरपणे पालन केले. या वेळी प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव यांनी प्राणिसंग्रहालयाची २१ वर्षातील वाटचाल आणि विकासाचा आढावा मांडला. सुचित्रा सूर्यवंशी यांनी प्राणी दत्तक योजनेत लोकसहभाग वाढवण्याची अपेक्षा व्यक्त केली.
-------------------
फोटो ओळ - राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाचा २२वा वर्धापन दिन केक कापून साजरा करताना कर्तव्यनिष्ठ महिला मंचाच्या सदस्यांसोबत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुचित्रा सूर्यवंशी.