एमआयटी विद्यापीठात योग दिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:08 IST2021-06-22T04:08:24+5:302021-06-22T04:08:24+5:30

आंतरराष्ट्रीय योग दिनासाठीचे प्रमुख पाहुणे योगा ट्रेनर कविता मोराजकर आणि विक्रम सिंह तोमर यांनी विद्यापीठात सोशल डिस्टंन्सींगचे पालन करत ...

Celebrate Yoga Day at MIT University | एमआयटी विद्यापीठात योग दिवस साजरा

एमआयटी विद्यापीठात योग दिवस साजरा

आंतरराष्ट्रीय योग दिनासाठीचे प्रमुख पाहुणे योगा ट्रेनर कविता मोराजकर आणि विक्रम सिंह तोमर यांनी विद्यापीठात सोशल डिस्टंन्सींगचे पालन करत सूर्यनमस्कार, कपालभाती सारख्या विविध आसनांचे धडे दिले. यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, मिटकॉमच्या संचालिका डॉ. सुनीता मंगेश कराड, प्र- कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, एमआयटी स्कूल ऑफ हॉलिस्टिक डेव्हलपमेंटचे प्रमुख डॉ. अतुल पाटील, डॉ.रामचंद्र पुजेरी, डॉ. असावरी भावे, डॉ. विरेंद्र शेटे, प्रा. कुष्णमुर्ती ठाकुर, प्रा. सुराज भोयर आदींनी आपला सहभाग नोंदवला. विविध विद्याशाखांचे संचालक व इतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते.

Web Title: Celebrate Yoga Day at MIT University