जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात
By Admin | Updated: January 28, 2017 00:02 IST2017-01-28T00:02:05+5:302017-01-28T00:02:05+5:30
शहर व परिसरात प्रजासत्ताकदिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. देशभक्तिपर गीते, सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे उत्साहात भर पडली.

जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात
शिरूर : शहर व परिसरात प्रजासत्ताकदिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. देशभक्तिपर गीते, सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे उत्साहात भर पडली. कर्डेलवाडी जि. प. शाळेत रेखाटलेल्या सामाजिक संदेश देणाऱ्या, तसेच महापुरुष व स्वातंत्र्यवीरांच्या रांगोळ्या सर्वांचे आकर्षण ठरल्या. नगर परिषद शाळेत तर महात्मा गांधी, झांशीची राणी, सावित्रीबाई फुले विद्यार्थ्यांच्या रूपात अवतरल्या.
तहसील कार्यालयात प्रांताधिकारी डॉ. वनश्री लाभसेटवार यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. तहसीलदार राजेंद्र पोळ, पंचायत समितीचे सभापती सिद्धार्थ कदम, नगर परिषद सभागृहनेते प्रकाश धारिवाल, नगराध्यक्षा सुवर्णा लोळगे, नवनिर्वाचित नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांच्यासह शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर या वेळी उपस्थित होते.
नगर परिषदेत नगराध्यक्षा लोळगे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. सर्व नगरसेवक, नगरसेविका, शिक्षण मंडळ सदस्य या वेळी उपस्थित होते.
नगर परिषद शाळा क्र .१ येथे सभागृहनेते धारिवाल यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
शिक्षण मंडळ कार्यालयात सभापती तुकाराम खोले, शाळा क्र. ५ व ७ मध्ये नगरसेविका सुनीता कालेवार, शाळा क्र. ३ मध्ये
शिक्षण मंडळ सदस्य नीलेश खाबिया यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
या शाळेत मुख्याध्यापक दत्तात्रय सकट, सहशिक्षिका बेबीनंदा सकट यांच्यासह विद्यार्थ्यांनी महापुरुष, स्वातंत्र्यवीर, तसेच सामाजिक संदेश देणारी सुंदर अशी रांगोळी रेखाटली. ही रांगोळी ग्रामस्थ व पालकांचे आकर्षण ठरली. रघुनाथ कर्डिले, राजेंद्र दसगुडे व राजाराम फरगडे यांनी शाळेस विविध साहित्य भेट दिले.
(वार्ताहर)