पोलीस, डॉक्टर व पत्रकार यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:14 IST2021-08-23T04:14:24+5:302021-08-23T04:14:24+5:30
यवत पोलीस ठाणे व यवत ग्रामीण रुग्णालय रुग्णालयात रक्षाबंधन समारंभ झाला. यवत पोलीस स्टेशनचे नव्याने नियुक्त झालेले पोलीस ...

पोलीस, डॉक्टर व पत्रकार यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे
यवत पोलीस ठाणे व यवत ग्रामीण रुग्णालय रुग्णालयात रक्षाबंधन समारंभ झाला. यवत पोलीस स्टेशनचे नव्याने नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक नारायण पवार व कर्मचारी, तर यवत ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. रमेश जाधव व कर्मचाऱ्यांना राष्ट्रवादी युवती काँग्रेस आणि समता परिषदेच्या वतीने राख्या बांधण्यात आला. या वेळी समता परिषदेच्या पुणे जिल्हा अध्यक्षा ज्योती झुरुंगे, तालुका अध्यक्षा आश्लेषा शेलार, दौंड राष्ट्रवादी काँग्रेस युवती अध्यक्षा सोनाली कुल, समता परिषदेचे दौंड तालुका कार्याध्यक्ष मंगेश रायकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
कोरोना साथीत स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजाचे हित पाहणारे पोलीस, डॉक्टर व पत्रकार हे सर्व बहिणींसाठी रक्षणकर्ते भाऊच असल्याने त्यांना राखी बांधून सर्व समाजाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यासाठी आजचा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे या वेळी समता परिषदेचे मंगेश रायकर यांनी सांगितले.
यवत पोलीस ठाण्यात समता परिषद व युवती राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने पोलीस निरीक्षक नारायण पवार व कर्मचाऱ्यांना राखी बांधताना.
220821\20210822_175308.jpg
फोटो ओळ :- यवत पोलीस ठाण्यात समता परिषद व युवती राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने पोलीस निरीक्षक नारायण पवार व कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षबंधन साजरे करण्यात आले