भोरमध्ये फोटोग्राफी दिन उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:14 IST2021-08-23T04:14:48+5:302021-08-23T04:14:48+5:30

कोरोना संकटामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. त्याचा फोटोग्राफी क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. अनेक छायाचित्रकार बेरोजगार झाले आहेत. ...

Celebrate Photography Day in the morning | भोरमध्ये फोटोग्राफी दिन उत्साहात साजरा

भोरमध्ये फोटोग्राफी दिन उत्साहात साजरा

कोरोना संकटामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. त्याचा फोटोग्राफी क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. अनेक छायाचित्रकार बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे भोर वेल्हा फोटोग्राफी क्षेत्रात दरवाढ करण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला आहे.

दुसऱ्या सत्रात भोर वेल्हा फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुधीर बाल्हेकर, उपाध्यक्षपदी अस्लम आतार, सचिवपदी नीलेश रेणुमे, सहसचिवपदी आणि खजिनदारपदी विजय काटकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सन २०२३ पर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे. या प्रसंगी माजी अध्यक्ष सारंग शेटे, धनंजय आंबवले, संतोष म्हस्के, इमान आतार, प्रशांत कांटे, तौसीफ आतार, वैभव कांटे उपस्थित होते.

सौ. गंगुताई पंतसचिव वाचनालयात हा कार्यक्रम पार पडला. या वेळी विविध फोटोचे चित्रीकरण करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता संतोष चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रत्युश गर्ग, कुमार जोगळेकर, विनीत सिंग, डिजिटल फॅन्टसीचे अनिल फेरवानी, सिद्धार्थ दावेर यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: Celebrate Photography Day in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.