एमआयटी एडीटी विद्यापीठातराष्ट्रीय युवक दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:27 IST2021-01-13T04:27:04+5:302021-01-13T04:27:04+5:30

पद्मश्री निवेदीता भिडे म्हणाल्या, स्वामी विवेकानंदांनी आपल्या तेजस्वी विचारांनी, ओघवत्या वक्तृत्वाने आणि राष्ट्रप्रेमाच्या ऊर्जेने जगभरातल्या युवकांना कायमच प्रेरणा दिली. ...

Celebrate National Youth Day at MIT ADT University | एमआयटी एडीटी विद्यापीठातराष्ट्रीय युवक दिन साजरा

एमआयटी एडीटी विद्यापीठातराष्ट्रीय युवक दिन साजरा

पद्मश्री निवेदीता भिडे म्हणाल्या, स्वामी विवेकानंदांनी आपल्या तेजस्वी विचारांनी, ओघवत्या वक्तृत्वाने आणि राष्ट्रप्रेमाच्या ऊर्जेने जगभरातल्या युवकांना कायमच प्रेरणा दिली. जगभरातील युवकांना जगण्याचा आणि जिंकण्याचा मूलमंत्र स्वामी विवेकानंदांनी दिला. आपण दुर्बल आहोत, हा विचार पहिल्यांदा प्रत्येकाने आपल्या मनातून काढून टाकावा. जीवन जगताना कोणतेही एक ध्येय मनाशी बाळगावे, त्याचा आयुष्यभर ध्यास धरावा, तो विचार पूर्ण करण्यासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावावी, ही शिकवण स्वामी विवेकानंदांनी आपल्याला दिली. राष्ट्राला बलशाली बनविण्यासाठी, त्यांच्या शिकवणीनुसार सर्व संघटीतपणे काम करावे.

प्रा. कुलगुरू अनंत चक्रदेव म्हणाले, 'उठा, जागे व्हा, आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका', हा जगण्याचा आणि जिंकण्याचा मूलमंत्र स्वामी विवेकानंदानी आपल्याला दिला, तोच मूलमंत्र आजच्या युवकांनी अंगिकारावा, तीच स्वामी विवेकानंदांना खरी आदरांजली ठरेल.

Web Title: Celebrate National Youth Day at MIT ADT University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.