जागतिक महिला दिन उरावडेत उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:10 IST2021-03-17T04:10:19+5:302021-03-17T04:10:19+5:30
यावेळी प्रेमा पाटील यांनी त्यांचा खाकी परेड ते कॅटवॉक पर्यंतचा प्रवास कंपनीमधील महिलांशी शेअर केला .महिलांशी संवाद साधत आनंदी ...

जागतिक महिला दिन उरावडेत उत्साहात साजरा
यावेळी प्रेमा पाटील यांनी त्यांचा खाकी परेड ते कॅटवॉक पर्यंतचा प्रवास कंपनीमधील महिलांशी शेअर केला .महिलांशी संवाद साधत आनंदी जीवनाचा कानमंत्र दिला तसेच व्यवहारिक गोष्टींचे मार्गदर्शनही केले. महिलांकरिता असलेल्या विशेष कायद्याबद्दलची माहितीही त्यांनी महिलांना दिली.
सतीश करंजकर यांनी सीएसआर फंडातून आत्तापर्यंत केलेल्या कामाची माहिती दिली. यामध्ये शाळा बांधकाम, शाळांमध्ये ई लर्निंग कीट, शौचालय बांधून देणे. महिलांसाठी कौशल्य विकास वर्ग सुरू करण्यात आले आहेत.तसेच कोवीडच्या काळात कंपनीने कोवीड सेंटरला औषधांचा पुरवठा केला. तसेच कंपनी वेळोवेळी गरजू लोकांना धान्य वाटपही करते.
कार्यक्रमाच्या वेळी कंपनीतील सर्व महिला व कंपनीचे एच आर मॅनेजर सतीश करंजकर व मान्यवर उपस्थित होते.
फोटो :- पिरंगुट येथील येथे महिला दिनानिमित्त उपस्थित पोलीस उपनिरीक्षक प्रेमा पाटील व अन्य मान्यवर