शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
5
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
6
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
7
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
8
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
9
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
10
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
11
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
12
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
13
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
14
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
15
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
16
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
17
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
18
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
19
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

आयुष्यातील अपयश साजरे करा : अनुपम खेर; रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१च्या वतीने ‘अध्याय १८’ परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 6:14 PM

आपल्या आयुष्यातील अपयश साजरे करा आणि यशाकडे जाण्याची एक संधी म्हणून त्याकडे बघा, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते आणि राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे (एफटीआयआय) अध्यक्ष अनुपम खेर यांनी केले. 

ठळक मुद्देमी चांगला अभिनेता कधीच नव्हतो : अनुपम खेर'आपण स्वत: पासूनच दुरावत चाललो असून लोकांशी नाही तर लोकांबद्दल बोलण्यात धन्यता मानतो'

पुणे : माझ्या बालवयात घडलेल्या अपयशाच्या प्रसंगात कुटुंबीयांनी मला कायम प्रोत्साहन देत माझे अपयश एका वेगळ्या पद्धतीने साजरे केले. त्यामुळे मनातील अपयशाची भीती जाऊन यशाचा मार्ग सुकर झाला. त्यामुळे आपल्या आयुष्यातील अपयश साजरे करा आणि यशाकडे जाण्याची एक संधी म्हणून त्याकडे बघा, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते आणि राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे (एफटीआयआय) अध्यक्ष अनुपम खेर यांनी केले. रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१च्या वतीने अध्याय १८ या विशेष परिषदेत ते बोलत होते. रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१चे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर अभय गाडगीळ, पुणे विद्यापीठ रोटरी क्लबच्या माजी अध्यक्षा दीपा गाडगीळ आदी उपस्थित होते. खेर म्हणाले, की लहानपणापासून मला अभिनय क्षेत्रात यायचे होते. मात्र मी चांगला अभिनेता कधीच नव्हतो. शाळेच्या अनेक कार्यक्रमांमधून मी अभिनयाचा छंद जोपासायचा प्रयत्न केला. पण नेहमी त्यामध्ये अपयशीच होत राहिलो. घरचे काय म्हणतील याची भीती मनात नेहमी असायची. पण घरच्यांनी माझ्या प्रयत्नांचे कौतुक करीत मला पाठबळ दिले. त्यामुळेच अपयशातून मी नॅशनल स्कूल आॅफ ड्रामामधून सुवर्णपदक घेऊन बाहेर पडलो. घरच्यांनी जर माझे अपयश माझे प्रयत्न म्हणून घेतले नसते तर आज कदाचित मी अभिनेता नसतो. आज आपण स्वत: पासूनच दुरावत चाललो असून लोकांशी नाही तर लोकांबद्दल बोलण्यात धन्यता मानतो. हे टाळत स्वत:चा विचार करा, तुमची मते काय आहेत ती समजून घेऊन वागण्याचा प्रयत्न करा, असेही खेर म्हणाले. रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१च्या वतीने आयोजित अध्याय १८ या परिषदेला लेखक चेतन भगत, कोल्हापूर परिमंडळाचे विशेष पोलीस महानिरीक्षकविश्वास नांगरे पाटील, क्रिकेटपटू युवराज सिंग आणि भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक जहीर खान आदी मान्यवर उपस्थित राहून आपला प्रवास उलगडणार आहेत.

टॅग्स :Anupam Kherअनुपम खेरPuneपुणेFTIIएफटीआयआय