VIDEO: शिक्रापूरमधील भीषण अपघाताचा व्हिडीओ आला समोर; असा घडला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 01:15 PM2022-01-24T13:15:51+5:302022-01-24T13:27:35+5:30

या अपघाताचे सीसीटिव्ही फुटेज समोर आले आहे

cctv footage of horrific accident in shikrapur 5 dead pune latest news | VIDEO: शिक्रापूरमधील भीषण अपघाताचा व्हिडीओ आला समोर; असा घडला अपघात

VIDEO: शिक्रापूरमधील भीषण अपघाताचा व्हिडीओ आला समोर; असा घडला अपघात

googlenewsNext

पुणे: पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूरजवळ रविवारी २४वा मैलनजीक ट्रकने कार आणि दोन दुचाकींना दिलेल्या धडकेत पाच जण ठार झाल्याची घटना घडली होती. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. हा भीषण अपघात नेमका कसा घडला यातून दिसत आहे. अपघातातील एका जखमीला तत्काळ रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. विठ्ठल हिंगाडे, रेश्मा विठ्ठल हिंगाडे (रा. पारनेर), लिना निकसे (रा. दांडेकर पूल पुणे) व अन्य दोन जण (नावे समजू शकली नाहीत) यांचा मृत्यू झाला होता.

घटनास्थळ व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नगर महामार्गावरून रविवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास नगरच्या दिशेने ट्रक निघाला होता. त्यावेळी दुसऱ्या लेनवरून एक कार आणि दोन दुचाकी पुणे बाजूकडे येत होत्या. शिक्रापूर येथील २४ वा मैलनजीक अचानकपणे ट्रक दुभाजकावरून दुसऱ्या लेनवर गेला अन् समोरून येणाऱ्या दोन दुचाकी आणि कारला जोराची धडक दिली होती.

नेमका अपघात कसा घडला याचा Video-

यामध्ये एका दुचाकीवरील हिंगाडे दाम्पत्याचा, कारमधील लिना निकसे तसेच अन्य एक जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, दोन जखमींना रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेत एका जखमीचा मृत्यू झाला होता. अन्य दोन मृतांची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Web Title: cctv footage of horrific accident in shikrapur 5 dead pune latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.