सीसी टीव्ही कागदावरच

By Admin | Updated: July 10, 2014 22:45 IST2014-07-10T22:45:18+5:302014-07-10T22:45:18+5:30

जर्मन बेकरी व जंगली महाराज रस्त्यावरील साखळी बॉम्बस्फोटानंतर पुणोकरांच्या सुरक्षेसाठी सीसी टीव्ही उभारण्यात येणार होते.

CC TV on paper | सीसी टीव्ही कागदावरच

सीसी टीव्ही कागदावरच

पुणो : जर्मन बेकरी व जंगली महाराज रस्त्यावरील साखळी बॉम्बस्फोटानंतर पुणोकरांच्या सुरक्षेसाठी सीसी टीव्ही उभारण्यात येणार होते. मात्र, गेल्या दोन वर्षात राज्य शासन व महापालिकेच्या समन्वयाअभावी सीसी टीव्ही योजना  कागदावरच आहे. 
जंगली महाराज रस्त्यावर साखळी बॉम्बस्फोट 1 ऑगस्ट 2क्12 ला झाला. त्यानंतर गृहमंत्री आर. आर. पाटील व पालकमंत्री अजित पवार यांनी गर्दीचे चौक व रस्त्यावर सीसी टीव्ही उभारण्याची घोषणा केली. मात्र, त्याचे नियंत्रण महापालिका की पोलीस करणार, याविषयी तिढा होता. अखेर महापालिकेने खासगी दुकानदारांच्या सहभागाने सीसी टीव्ही उभारण्याची योजना आणली.  दरम्यान, गृह खात्याने मुख्य चौकांत सीसी टीव्ही उभारण्यासाठी 5क् कोटींचा निधी मंजूर केला. महापालिकेने केबलसाठी खोदाई शुल्क माफ केले. त्यासाठीची खोदाई सुरू झाली. मात्र, पावसाळ्याच्या तोंडावर पुन्हा खोदाईचे काम थांबविण्यात आले आहे.  (प्रतिनिधी)

 

Web Title: CC TV on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.