पुणे : सातारा राजघराण्याची काही जमीन मुकुंद भवन ट्रस्टकडून बेकायदेशीरपणे बळकावण्यात आली असून याची चौकशी सीबीआयमार्फत करावी, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे छत्रपती उदयनराजे यांनी सांगितले. छत्रपती उदयनराजे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.ते म्हणाले, “या प्रकरणात तत्कालीन अधिकाऱ्यांनी आणि राजकीय नेत्यांनी मुकुंद भवन ट्रस्टला सहकार्य केले आहे. हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे. याप्रकरणी सुनावणी घेण्यात यावी, यासाठी मागील सहा वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, एकदाही सुनावणी घेण्यात आली नाही. यासाठी जिल्हाधिकारी डुडी यांची भेट घेतली आहे.”
मुकुंद भवन ट्रस्टप्रकरणी सीबीआय चौकशी करावी : उदयनराजे भोसले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 14:36 IST