दाभोलकर हत्या तपास घेण्यास सीबीआय अनुत्सुक

By Admin | Updated: May 9, 2014 09:06 IST2014-05-09T00:51:23+5:302014-05-09T09:06:16+5:30

- हायकोर्टाने निकाल राखून ठेवला

CBI is ineligible to look into the Dabholkar murder case | दाभोलकर हत्या तपास घेण्यास सीबीआय अनुत्सुक

दाभोलकर हत्या तपास घेण्यास सीबीआय अनुत्सुक

- हायकोर्टाने निकाल राखून ठेवला
मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास सीबीआयला सोपवण्याची आवश्यकता नसल्याचे गुरुवारी उच्च न्यायालयात स्पष्ट करण्यात आले़
न्या़ पी़ व्ही़ हरदास यांच्या खंडपीठासमोर सीबीआयने ही भूमिका मांडली़ या हत्येचे आरोपी राज्याबाहेर पळून गेले असते अथवा तपास यंत्रणेवर काही आरोप केले गेले असते तर याचा तपास सीबीआयला सोपवणे योग्य ठरले असते़ मात्र यातील आरोपी राज्याबाहेर पळाले आहेत, असा कोणताही दावा राज्य शासनाने केलेला नसल्याचा युक्तिवाद सीबीआयने केला़ तो ग्रा‘ धरत न्यायालयाने या हत्येचा तपास सीबीआयला सोपवावा, अशी मागणी करणार्‍या फौजदारी जनहित याचिकेवरील निकाल राखून ठेवला़
गेल्यावर्षी डॉ़ दाभोलकर यांची पुणे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली़ यातील आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसल्याने याचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी दाखल केली आहे़ तसेच हा तपास न्यायालयाच्या नियंत्रणात व्हावा, असा अर्ज डॉ़ दाभोलकर यांची कन्या मुक्ता हिने केला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: CBI is ineligible to look into the Dabholkar murder case