शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

TET परीक्षेतील गैरव्यवहाराचा तपास CBI कडे देण्याची गरज नाही- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 19:31 IST

महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या उद्घाटन समारंभानंतर अजित  पवार पत्रकर परिषदेत बोलत होते...

पुणे :परीक्षा परिषदेतील टीईटी परीक्षेच्या गैरव्यवहाराचा (TET Exam scam) तपास पुणे पोलीस योग्य पध्दतीने तपासणी करत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे (CBI) द्यावी, अशी मागणी केली जात असली तरी सध्या त्याची आवश्यकता नाही. गैरव्यवहार कोणाच्याही काळात झालेला असो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणा-या कोणाचीही गय केली जाणार नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शनिवारी स्पष्ट केले.

महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या उद्घाटन समारंभानंतर अजित  पवार पत्रकर परिषदेत बोलत होते. पवार म्हणाले, परीक्षा परिषद गैरवहार प्रकरणातील आरोपी तुकाराम सुपेकडे अजूनही रोख रक्कम सापडत असून ती कल्पनेच्या पलिकडील आहे. शासनातर्फे या प्रकरणाचा खोलवर तपास करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासातून अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant singh Rajput suicide case) याने आत्महत्या केल्याचे समोर आले होते. सीबीआयने केलेला तपास सुरूवातील भरकटला होता. त्यानंतर शेवटी आत्महत्या केल्याचेच निष्पन्न झाले होते. हे विसरता येणार नाही.

पवार म्हणाले, केंद्र शासनाने ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातही गर्दी टाळण्याचे व कोरोना विषयक सर्व नियमांचे नागरिकांनी काटेकोर पालन करण्याची आवश्यकता आहे. तसेच एस. टी. संपामुळे सर्व सामान्यांना त्रास होत आहे.कर्मचा-यांनी तुटेल एवढे ताणू नये.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारexamपरीक्षाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र