आजीच्या गळ्यातील दागिने पळविणाऱ्या महिलेस पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:13 IST2021-09-22T04:13:42+5:302021-09-22T04:13:42+5:30

या घटनेबाबत सरस्वती देवराम धुमाळ (वय ६५, रा. सुंदर संकुल, शिक्षक भवन, तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली ...

Caught the woman snatching the jewelry from Grandma's neck | आजीच्या गळ्यातील दागिने पळविणाऱ्या महिलेस पकडले

आजीच्या गळ्यातील दागिने पळविणाऱ्या महिलेस पकडले

या घटनेबाबत सरस्वती देवराम धुमाळ (वय ६५, रा. सुंदर संकुल, शिक्षक भवन, तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. रेश्मा विकास जाधव असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तळेगाव ढमढेरे येथील सरस्वती धुमाळ या आजी सोमवारी (दि. २०) दुपारी चारच्या सुमारास गीताई विष्णू मंगल कार्यालयासमोर उभ्या होत्या. यावेळी एक महिला त्या ठिकाणी आली आणि आजीला पत्ता विचारण्याचा बहाणा करून आजीच्या गळ्यातील सव्वा तोळे वजनाचे मनी मंगळसूत्र हिसकावून घेत आजीला ढकलून देऊन पळून गेली. दरम्यान, आजी खाली पडल्याने जखमी झाली. मात्र आजीने आरडा-ओरडा केल्याने शेजारील नागरिक त्या महिलेच्या पाठीमागे धावले. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, पोलीस हवालदार किशोर तेलंग यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने चोरी करणाऱ्या महिलेला पकडले. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी व पोलीस नाईक भरत कोळी करत आहेत.

Web Title: Caught the woman snatching the jewelry from Grandma's neck