गोमांस घेऊन जाणा-या टेम्पोला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:09 IST2021-04-17T04:09:17+5:302021-04-17T04:09:17+5:30

मुशरीफ महंमद फकीर (वय 31, रा. उमदा प्लाझा जुना एसटी स्टॅन्ड जुन्नर) या टेम्पो चालकाला अटक केली असून याबाबतची ...

Caught the tempo carrying the beef | गोमांस घेऊन जाणा-या टेम्पोला पकडले

गोमांस घेऊन जाणा-या टेम्पोला पकडले

मुशरीफ महंमद फकीर (वय 31, रा. उमदा प्लाझा जुना एसटी स्टॅन्ड जुन्नर) या टेम्पो चालकाला अटक केली असून याबाबतची फिर्याद समाजसेवक कृष्णा प्रताप माने (वय 25) रा. नारायणगाव यांनी दिली आहे. याबाबत ताटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, समाजसेवक कृष्णा माने यांना माहिती मिळाली की, संगमनेरहुन पुण्याचे दिशेने अशोक लेलंड कंपनीचा टेम्पो (एम.एच.14 जे.यु.9789) मधुन गोमांस नेण्यात येत आहे. या माहितीवरून माने यांनी पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांचेसह बजरंग दलाचे कार्यकर्ते अनिकेत चिखले, सिद्धेष पडघम, गणेष थोरात, हृषीकेश जंगम यानी दि.15 एप्रिल 2021 रोजी रात्री 11 वाजता नारायणगाव हद्दीत सापळा रचला मध्यरात्री 12 नंतर संगमनेरहून आलेल्या टेम्पोला हात केला असता टेम्पो थांबला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पाठलाग करून मांजरवाडी फाट्याजवळ टेम्पो बाजूला घेण्यास भाग पाडले व टेम्पोची तपासणी केली असता ताडपत्री खाली झाकून ठेवलेले गोमांस आढळून आले.

Web Title: Caught the tempo carrying the beef