गाई चोरताना दोन चोरट्यांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:10 IST2021-07-31T04:10:43+5:302021-07-31T04:10:43+5:30

ग्रामस्थांच्या मदतीने पकडण्यात आले. शिरोली येथील शेतकरी विजय गोपाळ पवळे (वय ४०) हे गुरुवार (दि.२९) रोजी दुपारी एकच्यादरम्यान आपल्या ...

Catching two thieves while stealing a cow | गाई चोरताना दोन चोरट्यांना पकडले

गाई चोरताना दोन चोरट्यांना पकडले

ग्रामस्थांच्या मदतीने पकडण्यात आले.

शिरोली येथील शेतकरी विजय गोपाळ पवळे (वय ४०) हे गुरुवार (दि.२९) रोजी दुपारी एकच्यादरम्यान आपल्या शेतात शेतकाम करत असताना त्यांनी पहिले कि लांब शेतात बांधलेली गाय सुटली त्यामुळे सुटलेली गाय बांधण्यासाठी विजय पवळे हे गायी जवळ गेले असता तेथे एक छोटा हत्ती वाहन (एम.एच.१४ एच.यु.२४१८) या गाडीमध्ये त्यांची दुसरी गाय भरत असताना त्यांनी दोन इसमांना पाहिले. सुटलेली गाय खुंटीला बांधून त्यांनी त्वरित

आरडाओरडा करून जवळपासच्या शेतातील ग्रामस्थांना मदतीसाठी बोलाविले व गायीला गाडीमध्ये भरणाऱ्या दोनइसमांना व गाडीला जागेवरच थांबवून ठेवले व त्वरित राजगुरुनगर पोलिसांना कळवून गायी चोरीच्या उद्देशाने आलेल्या दोन इसमांना गाडीसह पोलिसांच्या ताब्यात दिले. दिलीप सोपान गावडे (रा. धानोरे खंडोबाचीवाडी, ता. खेड) व सोमनाथ शिवाजी चौधरी (रा. मरकळरोड, घोलपवस्ती आळंदी, ता. खेड) यांचे विरुद्ध फिर्याद दिली आहे.

Web Title: Catching two thieves while stealing a cow