शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

"माझी दारूची भट्टी असली तरी मला पकडा अन् टायरमध्ये घाला", अजित पवारांनी पोलिसांचे उपटले कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2023 21:26 IST

पाहुणेवाडी येथे रविवारी (दि. २१) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

बारामती : माझी दारूची भट्टी असली तरी मला पकडा आणि टायर मध्ये घाला, अशा शब्दात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी बारामती तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत बारामती पोलिसांचे कान उपटले. पाहुणेवाडी येथे रविवारी (दि. २१) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. 

पवार यांचे भाषण सुरू असताना पाहुणेवाडी येथील ग्रामस्थांनी पवार यांना अवैध धंद्याबाबत पत्र दिले. हे पत्र भर सभेत अजित पवार यांनी वाचून दाखवले. ते म्हणाले, शरद  पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार आम्ही येतो  दारूच्या भट्ट्या शोधत बसतो. पोलिस  निवांत पगार  घेतील. तुम्हाला तर मी सॅल्यूटच करतो. मी कितीतरी वेळा सांगतो माझा यामध्ये काही हस्तक्षेप नसतो, असे अजित पवार म्हणाले. 

यावेळी त्यांनी ग्रामस्थांनी दिलेले पत्र भर सभेमध्ये वाचून दाखवले. पुणे ग्रामीण व माळेगाव पोलीस ठाणे यांना दारूबंदी होण्याबाबत पत्रव्यवहार केला होता मात्र त्यांनी दखल केली घेतली नाही. असे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले होते. यावेळी अजित पवार यांनी ग्रामस्थांच्या मागणीचे पत्र पोलीस अधिकाऱ्यांच्या हातात देत सह्यांचा कागद मात्र मी माझ्याकडे ठेवतो नाहीतर हे पत्र मला कोणी दिलेत त्यांच्या मागे तुम्ही लागाल, अशा शब्दांमध्ये पोलिसांची भंबेरी उडवली. 

ते पुढे म्हणाले, पुढच्या वेळी कोणी पाहुणेवाडीचे मला भेटले तर आवर्जून सांगा की दादा तुम्ही सांगितल्यानंतर पोलिसांनी दारूबंदीसाठी पावले उचलली. उद्या माझी जरी भट्टी सापडली मला पकडा आणि टायर मध्ये घाला, असे पवार म्हणतात सभेमध्ये एकच हशा पिकला.

ग्रामस्थांकडून दारू बंदीचे निवदेनपाहुणेवाडी  गावात सर्रासपणे रात्रंदिवस अवैध दारूचे धंदे सुरू आहेत. गावात अनेक घरे उध्वस्त झाली आहेत. यामुळे गावात तंटा निर्माण होत असतो, ग्रामसभेत अनेकदा महिलांच्या व ग्रामस्थांच्या मागणीनुसार दारू बंदीचा ठराव होऊन देखील पोलीस प्रशासनाकडून निवेदनाला केराची टोपली दाखवली आहे. यामुळे ग्रामस्थांनी पुन्हा एकदा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडे दारू बंदीचे निवेदन देण्यात आले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPuneपुणे