शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

जात पंचायतीने कुटुंबाला केले वर्षासाठी बहिष्कृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 4:17 AM

सासवड : भातू समाजातील न्यायाधीश व्यक्तीला शिवीगाळ केली म्हणून जात पंचायतीने दोन महिलांना व त्यांच्या कुटुंबाला समाजातून १ वर्षासाठी ...

सासवड : भातू समाजातील न्यायाधीश व्यक्तीला शिवीगाळ केली म्हणून जात पंचायतीने दोन महिलांना व त्यांच्या कुटुंबाला समाजातून १ वर्षासाठी बहिष्कृत करण्याचा ठराव केल्याची घटना पुरंदर तालुक्यातील गराडे येथे घडली. जर समाजात परत यायचे असल्यास त्या मोबदल्यात ५ बोकड, पाच दारूच्या बाटल्या व १ लाख रुपये दंडाची मागणी करण्यात आली. ती न दिल्यास जात पंचयातीने कायमस्वरूपी बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. या प्रकरणी पीडित कुटुंबाने पोलिसांत तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी सुरेश रत्न बिनवात (रा. सत्वनगर, महंमदवाडी), सप्त पन्नालाल बिनवात (रा. सत्वनगर), नंदू आत्राम रजपूत (रा. वारजे जकात नाक्याजवळ), मुन्ना रमेश कचरावत (रा. वारजे माळवाडी), आनंद रामचंद्र बिनावत (रा. सातवनगर), देविदास राजू चव्हाण (रा. नऱ्हे गाव), देवानंद राजू कुंभार (रा. धनकवडी) यांच्याविरुद्ध सुहानी विकास कुंभार यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही घटना पुरंदर तालुक्यातील गराडे येथील असल्याने हा गुन्हा सासवड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

सुहानी ऊर्फ रिटा विकास यांचे वडील मनोज रामचंद्र कुंभार यांचे निधन झाले. सुहानी यांची आई नंदा मनोज कुंभार या धनकवडी येथे एकट्याच राहतात. दोन महिन्यांपासून जात पंचायतीचे पंच सुरेश बिनवात व मुन्ना बिनवात व इतर सुहानी यांच्या मागे त्यांच्या मालमत्तेचा निवाडा करण्याचा आग्रह धरत होते. याला त्यांच्या आई नंदा कुंभार यांनी नकार दिला. यामुळे त्यांना पंचांनी शिवीगाळ केली. ही बाब नंदा यांनी त्याची मुलगी सुहानी हिला सांगितले. यावर सुहानी यांनी समाजाच्या ग्रुपवर मेसेज करत माझ्या आईला व बहिणीला त्रास देऊ नका, असे सांगितले. त्याला प्रत्युत्तर देत सुरेश बिनावत यांनी समाजातील १२ गावचे पदाधिकारी, १२ जातीचे सर्व पाहुणे मित्र मंडळी यांना गेल्या महिन्यात ३ नोव्हेंबरला राजलीला मंगल कार्यालय येथे उपस्थित राहण्यास सांगत रिटा व पूजा या दोघी बहिणींना सर्व समाजासमोर माफी मागण्यास सांगितले. मात्र, त्यांनी नकार दिल्याने त्यांनी १ वर्षासाठी बहिष्कृत केले तसेच त्यांना दंड ठोठावला. तसा व्हिडीओ समाजाच्या ग्रुपवर पाठवला. याविरुद्ध सुहानी विकास कुंभार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.