शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

नगरसेवकांच्या जातप्रमाणपत्राची प्रकरणे सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 3:54 AM

महापालिका निवडणूक होऊन वर्ष उलटून गेले, तरीही नगरसेवकांच्या जातप्रमाणपत्राच्या विरोधात दाखल झालेली प्रकरणे न्यायालयात सुरूच आहेत. नुकत्याच लागलेल्या निकालात हरिदास चरवड यांचे प्रमाणपत्र वैध ठरवण्यात आले, तर कविता वैरागे यांचा मुदतीत प्रमाणपत्र सादर करण्याचा वाद थेट सर्वोच्च न्यायालयातच गेला.

पुणे - महापालिका निवडणूक होऊन वर्ष उलटून गेले, तरीही नगरसेवकांच्या जातप्रमाणपत्राच्या विरोधात दाखल झालेली प्रकरणे न्यायालयात सुरूच आहेत. नुकत्याच लागलेल्या निकालात हरिदास चरवड यांचे प्रमाणपत्र वैध ठरवण्यात आले, तर कविता वैरागे यांचा मुदतीत प्रमाणपत्र सादर करण्याचा वाद थेट सर्वोच्च न्यायालयातच गेला.चरवड यांच्या विरोधात त्यांचे प्रतिस्पर्धी अक्रुर कुदळे यांनी त्यांचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र बनावट असल्याचा दावा दाखल केला होता. त्याच्या सुनावणीत न्यायालयाने चरवड यांनी प्रमाणपत्र मिळावे म्हणून सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची तपासणी करावी व निर्णय घ्यावा, असे आदेश जातप्रमाणपत्र पडताळणी समितीला दिले होते. समितीने त्याप्रमाणे सर्व पुराव्यांची तपासणी केली व ते प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल दिला. तो आता न्यायालयात सादर करण्यात येईल, असे चरवड यांनी सांगितले.दुसऱ्या एका प्रकरणात नगरसेविका कविता वैरागे यांनी आपले प्रमाणपत्र निवडणूक झाल्यानंतर, ६ महिन्यांत सादर न करता ६ महिने होऊन गेल्यानंतर, २ दिवसांनी सादर केले होते. समितीकडून आपल्याला प्रमाणपत्र मिळण्यास उशीर झाल्याबद्दल त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात आपल्यावर कसलीही कारवाई करू नये, अशी विनंती न्यायालयाला केली होती. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार शर्वरी गोतारणे यांनी या प्रकरणात आपलेही म्हणणे ऐकून घ्यावे, असा अर्ज न्यायालयात केला होता.या प्रकरणाच्या सुनावणीत न्यायालयाने वैरागे यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्यास सांगितले आहे. तिथे या प्रकरणासारखीच काही प्रकरणे प्रलंबित आहे. त्या सर्व प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना विलंबाने प्रमाणपत्र दाखल केलेल्या नगरसेवकांवर कसलीही कारवाई करायला स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयापेक्षा ते वरिष्ठ न्यायालय असल्यामुळे वैरागे यांच्या प्रकरणात येथे निकाल देणे योग्य नाही. त्यांनी येत्या आठ आठवड्यांत सर्वोच्च न्यायालयाकडे अर्ज दाखल करावा व अन्य प्रकरणांप्रमाणेच स्थगिती आदेश मिळवावा अथवा न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करावी, असे सांगत उच्च न्यायालयाने वैरागे यांची आपणावर कारवाई करू नये, म्हणून दाखल केलेली याचिका फेटाळली.वैरागे व चरवड हे दोन्ही नगरसेवक महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचेच आहेत. वैरागे प्रभाग क्रमांक २८ अ चे प्रतिनिधित्व करतात, तर चरवड प्रभाग क्रमांक ३३ अ मधून निवडून आले आहेत. याआधीही भाजपा, राष्ट्रवादी,तसेच काँग्रेसच्याही काही उमेदवारांचे नगरसेवकपद रद्द झाले आहेत, तर काहींची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत.

टॅग्स :Puneपुणे