शहरं
Join us  
Trending Stories
1
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
2
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
3
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
4
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
5
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
6
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
7
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   
8
"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'
9
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
10
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या
11
Sanjay Nirupam: "राज ठाकरेंनी नवा छंद जोपासलाय, ते...", संजय निरुपम नेमकं काय बोलून गेले? पाहा
12
"युद्ध थांबवण्याची खरी वेळ...!" रशिया-युक्रेन युद्धावर झेलेंस्की यांचं मोठं विधान
13
Diwali Bonus: मुंबई विमानतळावरील कामगारांची दिवाळी दणक्यात, मिळाला 'इतका' बोनस!
14
Laxmi Pujan 2025 Wishes: लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!
15
चीनचा अमेरिकेला आणखी एक झटका; ७ वर्षात पहिल्यांदा असं काही घडलं, डोनाल्ड ट्रम्प चिंतेत पडले
16
OLA कंपनीतील कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, २८ पानी अखेरची चिठ्ठी सापडली; मालकावर FIR दाखल
17
पुढच्या वर्षी 1.60 लाखपर्यंत पोहोचू शकतं सोनं; चांदी कितीपर्यंत वधारणार? जाणून डोळे फिरतील!
18
टायर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं घेतला रॉकेट स्पीड, q2 च्या रिझल्टने गुंतवणूकदार खुश!
19
Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
20
दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Nifty २५,८४३ वर बंद, उद्या मुहूर्त ट्रेडिंग

शनिवारवाडयात नमाज पठण करणाऱ्या अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 13:31 IST

नमाज पठण प्रकारणानंतर हिंदू संघटनांकडून शनिवारवाड्यातील कबर हटवण्यासाठी ८ दिवसाचा अल्टीमेटम देण्यात आला आहे.

पुणे : पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्यात नमाज पठण केल्याचा दावा केला जात आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली असून, विविध हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पतित पावन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवार वाड्यात आंदोलन केलं. संघटनेने सांगितलं की, त्यांनी त्या जागेवर गोमूत्र शिंपडून ती जागा पवित्र केली तसेच शेणाने सारवून जागा शुद्ध करण्याचा विधीही पार पाडला. यानंतर शनिवारवाड्यात ‘शिववंदना’ सादर करण्यात आली. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, अशा प्रकारच्या घटना भविष्यात सहन केल्या जाणार नाहीत.  

खासदार मेधा कुलकर्णी यांनीसुद्धा तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटलं की, “यापुढे अशा प्रकारचे प्रकार काहीही झालं तरी आम्ही खपवून घेणार नाही.” त्यांनी प्रशासनाला अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी काल शनिवारवाडा येथे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसह आंदोलन केले. त्यानंतर शनिवारवाडा नमाज पठण प्रकरणात अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारवाडा ही भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाची वास्तू आहे. पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्याकडून रात्री तक्रार प्राप्त झाली आहे. त्यानंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यात अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास विश्रामबाग पोलिस करत आहेत.

शनिवार वाड्यावर पोलीस बंदोबस्त वाढवला 

पुण्यातील शनिवारवाड्यात असणाऱ्या कबरी बाहेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. काल हिंदू संघटनांनी आणि भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी या कबरी विरोधात आंदोलन केलं होत. शनिवार वाड्यात काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्यानंतर आंदोलन करण्यात आलं होतं. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. हिंदू संघटनांकडून ही कबर हटवण्यासाठी ८ दिवसाचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Case Filed Against Women Offering Namaz at Shaniwar Wada

Web Summary : After a video surfaced of women offering Namaz at Shaniwar Wada, Hindu organizations protested, purifying the area. A police complaint has been filed against the unknown women, and security has been increased at the location.
टॅग्स :PuneपुणेShaniwar Wadaशनिवारवाडाmedha kulkarniमेधा कुलकर्णीagitationआंदोलनPoliceपोलिसWomenमहिला